- Log in to post comments
नमस्कार!!
जरा एका पुस्तकाची माहिती हवी आहे.
माझी पत्नी शिक्षिका आहे.नुकतेच तिला तिच्या शाळेतर्फे नाशिकला एका इण्टरनॅशनल स्कूल मधे २ दिवस ट्रेनिंग करता पाठवले होते. त्या विषयी प्रतिक्रिया देतांना ती म्हणाली की त्या ट्रेनिंग मधल्या काही बाबी तिच्या शाळेसाठी उपयोगी नव्हत्या कारण तिच्या शाळेत गरीबा घरची मुले अधिक आहेत. तर मी तिला अनुताई वाघांचे "कोसबाडच्या टेकडी वरून"हे पुस्तक वाचायला सुचवले. यात महाग शैक्षणिक साधने न वापरता अनुताईंनी केलेले शिक्षण विषयक प्रयोग आहेत. तसेच दादर च्या बालमोहन चे संस्थापक्/मुख्याध्यापक (चु.भु.दे.घे.) रेगे यांचे पुस्तक ही सुचवले. पण त्याचे नाव मला काही केल्या आठवत नाहीये. तर त्या पुस्तकाचे नाव , प्रकाशन गृह ही माहिती हवी आहे म्हणजे तिला ते मागवता येइल.
तरी ही माहिती तुम्हाला ठाउक असेल तर अथवा तुमच्या समानशील मित्रांपैकी कुणाला ठाउक असल्यास कळवावी ही विनंती.
तसे आधी मी जालावरील चांगले अभ्यासू वाचक अशी ओळख असलेल्या दोघांना ( प्रत्यक्ष भेट अजून झाली नाही, होईल कधी तरी नक्कीच )व्य.नि. करून ही माहिती विचारली आहे ते ही आपल्या परिने शोध घेत आहेत. पण मी विचार केला सगळे वाचनवेडे आपले मित्रच! म्हणून इथे ही लिहीले. मला ही दोनच पुस्तके आठवली तुम्हाला आणखी कोणचे ( मराठी/ इंग्रजी) सुचवावेसे वाटले तर प्रतिसादात जरूर लिहा.
अभिप्राय
सागर
सागर · Wed, 29 Dec 2010 - 08:25
बालमोहन विद्यामंदिर'चे कार्यकारी विश्वस्त डॉ. बापूसाहेब रेगे यांनी
१. 'बालमोहन-आज व उद्या'
२. 'माणूस घडविण्यासाठी' (४६ शिक्षणतज्ज्ञांच्या लेखाचा संग्रह)
३. 'ओळख मुलांची व आपली'
४. 'किमयागार दादा'
अशी चार पुस्तकं संपादित व प्रकाशित केली आहेत.
बघा यात तुम्हाला हवे ते पुस्तक आहे का? :)
सागर
सागर · गुरुवार, 30 Dec 2010 - 08:41 · उत्तर
मिलिंद बोकीलांचे 'शाळा' देखील ऐकून आहे. (मी अजून वाचले नाहिये, त्यामुळे) कसे आहे ते माहिती नाहीये
पण आपल्या येथीलच एक सन्माननीय सदस्य चिंतातूर जंतू यांनी 'लिहावे नेटके' या पुस्तकाबद्दल इथेच लिहिले आहे. ते कृपया वाचा. हे ही सुंदर पुस्तक आहे.
श्रीकांत बोरवणकर
श्रीकांत बोरवणकर · Wed, 29 Dec 2010 - 08:38
ठॅन्कू बर का सागर, लगेच उत्तर लिहिले त्या बद्दल. अन आणखी पुढे जे प्रतिसाद येतील त्या बद्द्ल ही.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Wed, 29 Dec 2010 - 09:09
१) नीलची शाळा (नील समरहिल) - राजहंस प्रकाशनाचं आहे पुस्तक.
२) तोतोचान (तेत्सुको कुणीतरी!) - एनबीटीचं प्रकाशन आणि कल्पना गोसावींचा अनुवाद.
सागर
सागर · Wed, 29 Dec 2010 - 09:39 · उत्तर
मस्तच आहेत ही दोन्ही पुस्तके.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 29 Dec 2010 - 09:13
तोत्तोचान वाचावे. जरी तसे प्रयोग आपल्या शिक्षण धोरणामुळे थेट करणे कठीण असले तरी प्रत्येक शिक्षकाने वाचावे व जमेल ते प्रयोग करावेत असे ते पुस्तक आहे.
लवकरच याबद्दल लिहितो देखील आहे.
सागर
सागर · Wed, 29 Dec 2010 - 09:41 · उत्तर
तोत्तोचान मुळे शिक्षणाच्या पद्धतीत नक्की सकारात्मक बदल होऊ शकेन. जर प्रत्यक्षात आणले तर.
लवकरच याबद्दल लिहितो देखील आहे
ऋ , वाट बघतोय रे... लवकर लिहि :)
रैना
रैना · Wed, 29 Dec 2010 - 10:34
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Sat, 26 Feb 2011 - 08:35
मी अलिकडेच पुवि वर आले आहे. त्यामुळे आत्ताच हे वाचले. तुमच्या शिक्षक पत्नीला उपयुक्त होतील अशी ह्यांची खालील पुस्तके --
टीचर- सिल्विया अॅश्ट्न वॉर्नर (अनु. अरुण ठाकूर )