सध्या काय वाचताय? (भाग ४)

सागर

मजकूर

सध्या काय वाचताय? (भाग ३)

भाग ३ दुसर्‍या पानावर गेला असल्यामुळे नवीन धागा सुरु करतो आहे.

मी आधी पर्व वाचायला घेतले होते पण मूड नाही लागला. म्हणून सुहास शिरवळकरांचे तुकडा तुकडा चंद्र हे पुस्तक वाचायला घेतले आहे. वेगात १ प्रकरण झाले आहे वाचून.
त्यानंतर बहुतेक अ‍ॅडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या 'माईन काम्फ'चा संपूर्ण अनुवाद मराठीत श्रीराम ढवळीकर यांनी केला आहे ते घेईन वाचायला.

अभिप्राय

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sun, 13 Mar 2011 - 20:18

सागर,
अ‍ॅडॉल्फ हिटलरचे 'माईन काम्फ' हे मूळ पुस्तक www.bookganga.com ह्या साईटवर मोफत उपलब्ध आहे. मी ते उतरवूनही घेतले आहे. पण इतर काही कामांमध्ये इतकी बुडाले आहे की सध्या ते वाचणे अशक्य! मराठीत श्री.ढ. ह्यांनी अनुवाद केलेल्या ह्या पुस्तकाचे प्रकाशन कोणाचे आहे?
`पुवि'वर वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती मिळते आहे. ज्यांच्या वाटेला जाण्याचे माझ्या मनातही कधी आले नव्हते असे विषय समजताहेत आणि चक्क मला त्याविषयी वाचण्यात रस निर्माण झाला आहे. उदा. इतिहास, नाझी, युध्द, सुशि, इ. द ड्वार्फ सारखी इंग्रजी पुस्तकेदेखील इंटरेस्टिंग वाटताहेत.
प्रत्यक्ष वाचन कधी सुरू करू शकेन ते माहिती नाही. पण `वाचावयाच्या' यादीत भर पडत आहे. त्यामुळे `पुवि'वर आल्याचा आनंद आहे.

सागर

सागर · Mon, 14 Mar 2011 - 05:30 · उत्तर

चित्रा,
माझ्याकडे पण मूळ माईन काम्फ चा इंग्रजी अनुवाद आहे. पीडीएफ स्वरुपात.
नाझी भस्मासुराचा उदयास्त मध्ये कानिटकरांनी संक्षिप्त अनुवाद दिला होता माईन काम्फचा
पण मराठीत जसाच्या तसा अनुवाद उपलब्ध नव्हता. तो अलिकडेच राजेश प्रकाशन, पुणे यांनी मराठीत आणला
माईन काम्फ चे दोन भाग आहेत ते दोन्ही एकत्रित या पुस्तकात आहेत
कसे आहे ते आताच नाही सांगत, कारण वाचायचे आहे. वाचल्यावरच प्रतिक्रिया देईन

आनंदयात्री

आनंदयात्री · Mon, 14 Mar 2011 - 15:55 · उत्तर

>>मराठीत जसाच्या तसा अनुवाद उपलब्ध नव्हता. तो अलिकडेच राजेश प्रकाशन, पुणे यांनी मराठीत आणला

७-८ वर्षांपुर्वी माईन काम्फ मराठीत वाचल्याचे स्मरते, तो हाच का ?

सागर

सागर · Mon, 14 Mar 2011 - 16:49 · उत्तर

७-८ वर्षांपुर्वी माईन काम्फ मराठीत वाचल्याचे स्मरते, तो हाच का ?

माईन काम्फ चा संपूर्ण अनुवाद मराठीत माझ्या माहितीप्रमाणे तरी उपलब्ध नव्हता.
मी बराच शोध घेतला होता. पण मिळाला नव्हता. श्रीराम ढवळीकर यांनी केलेल्या अनुवादावर प्रकाशन दिनांक नाहिये. कॉपीराईट मुळे बर्‍याच गोष्टी त्यात दिसत नाहियेत, पण हे अलिकडचेच २०१० मधले प्रकाशन आहे.

माईन काम्फ आधी कधी मराठीत असल्यास कृपया माहिती दे. मला नक्की आवडेल त्या पुस्तकाचा शोध घ्यायला.
कोणी अनुवाद केलाय कोणाचे प्रकाशन होते एवढे कळाले तरी शोधता येईल :)

सागर

सागर · Mon, 28 Mar 2011 - 10:15 · उत्तर

हेच आहे माझ्याकडे
आधी शोधले तेव्हा सापडले नव्हते :(

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 14 Mar 2011 - 06:05

वल्ली,
माझं नाव भैरप्पा... हे आत्मचरित्र तुम्ही वाचलं आहेत का? चारेक वर्षांपूर्वी मी ते वाचलं होतं आणि मला ते आवडलं होतं. पुन्हा एकदा ते वाचणार आहे.
त्यात त्यांच्या कादंबरी-लेखनाविषयी सविस्तर लिहिले आहे. परंतु मी अजून त्यात शिरलेली नाही.

वल्ली

वल्ली · Mon, 14 Mar 2011 - 06:14 · उत्तर

पण लवकरच घ्यायचा विचार आहे. पाहू कसे जमते ते. तसा माझा आत्मचरित्रांकडे फारसा ओढा नाहीये.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 14 Mar 2011 - 13:27 · उत्तर

वल्ली,
सहसा, ज्यांचे लिखाण मला आवडते त्यांच्या आयुष्याविषयी, जगण्याविषयी मला जाणून घ्यावेसे वाटते. पण भैरप्पांच्या बाबतीत बरोब्बर उलटे झाले आहे. त्यांच्या आत्मचरित्रामुळे मला त्यांच्या कादंबर्‍या वाचाव्याशा वाटताहेत.

अभिजितमोहोळकर

अभिजितमोहोळकर · Mon, 14 Mar 2011 - 08:27

आजकाल वाचन होत नाही त्यामुळे......

वल्ली

वल्ली · Mon, 14 Mar 2011 - 08:41 · उत्तर

खंत वाटून घेउ नका. वाचनाला सुरुवात करा. खंत आपोआप दूर होईल.

आरागॉर्न

आरागॉर्न · Mon, 14 Mar 2011 - 13:47

स्मोक अँड मिरर्स - नेल गेमन

या लेखकाबद्दल बरेच ऐकले/वाचले होते पण अजून वाचायचा योग आला नव्हता. अमेरिकन गॉड्स ही त्याची एक गाजलेली कादंबरी. कथाप्रकार सरीयल फँटसीच्या दिशेने जातो असे वाटते. वाचकाला चटकन गुंतवून ठेवण्याचे लेखकाच कसब विलक्षण आहे.

आनंदयात्री

आनंदयात्री · Mon, 14 Mar 2011 - 15:57 · उत्तर

कसली भारी भारी पुस्तकं वाचतोस रे !! मस्त !!
आम्हाला सांग मग काय होते त्या पुस्तकात ते एक फंटास्टिक परिचय लिहुन.

आरागॉर्न

आरागॉर्न · Wed, 16 Mar 2011 - 05:24 · उत्तर

कसली भारी भारी पुस्तकं वाचतोस रे !! मस्त !!

मी जे हातात येईल ते वाचतो.. हे पुस्तक सुदैवाने बीसीएलमध्ये मिळाले.. :)

मिहिर

मिहिर · Mon, 14 Mar 2011 - 14:13

सध्या इरावती कर्वेंचे 'युगान्त' वाचतोय.

यशोधरा

यशोधरा · गुरुवार, 17 Mar 2011 - 13:55

माझा साक्षात्कारी हृदयरोग संपवले. अफाट आवडले.
विस्मृतीचित्रे वाचायला सुरुवात केली आहे.
चकवाचांदण अर्धवट झालंय, ते पूर्ण करायचं आहे.

रोचीन

रोचीन · Fri, 18 Mar 2011 - 06:52

शांता गोखलेंचं त्या वर्षी... संपवलं!!!!! आता गंगाधर गाडगिळांचा कथासंग्रह सुरु करेन!!

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 21 Mar 2011 - 11:07

आता येत्या शुक्रवारपासून जरा जरा वेळ मिळेल असं वाटतंय
मोर्चा पुन्हा इंग्रजी पुस्तकांकडे वळवला आहे. एका वेळी ३ पुस्तकांमधे डोकं घातलं आहे:

१. Empire लेखक निआ'ल फर्ग्युसन: पुस्तकाचं पूर्ण नाव आहे: 'Empire: How Britain Made The Modern World'"सुरवात फारच सुंदर आहे. आपल्यावर असणारा ब्रिटीश अंमल हा आपल्यासाठी पारतंत्र्य असल्याने जरी झुगारणे आवश्यक असला तरी ब्रिटीश अंमल किंवा हे जगाच्या प्रगतीच्या दृष्टीने 'Empire' वाईट होतं का? एका ब्रिटीश माणसाच्या भुमिकेतून / दृष्टीकोनातून हा विषय पुढे नेणारं पुस्तकं.. एक अगदी वेगळा दृष्टीकोन वाचायला मिळतोय. (अर्थात प्रो-एम्पायर' असले व ब्रितीश माणसाने लिहिल्यामुळे येणारे स्वाभाविक (कधीकधी जरा जास्त) ब्रिटन प्रेम जरा नजरे आड केले तर फार रोचक माहिती हाती लागते आहे)

२. The lost Symbol - Dan Brown: बरेच दिवस पेंडींग होतं. आता वाचतोय

३. Complete works of Swami vivekananda - Volume IX: विवेकानंदानी लिहिलेल्या पत्रांचे/ लेखनाचे संगरह आहेत. याआधीचे सारे भाग वाचले आहेत असं नाही (म्हणजे नाहीच वाचलेत :) ) पण या मालिकेतील कोणतत्याही पुस्तकातील कोणतेही संभाषण / लेखन वाचले की काहितरी नवे हाती लागते..

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 28 Mar 2011 - 08:57 · उत्तर

The lost Symbol - Dan Brown संप(व)ले.. ठिक आहे.. लेखक अश्या लिखाणासाठी प्रसिद्ध असला तरी (बहुदा आता सवयीने) तितकेसे धक्के बसत नाहीत आणि तथ्ये फार रोचकही वाटली नाहीत .. पुस्तक ओके-ओके वाटले.. सहज हातात आले तर एकदा वाचायला हरकत नाही .. मात्र शोधाशोध करून वाचण्यासारखे नक्कीच नाही

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 21 Mar 2011 - 12:00

सध्या अनिल कुसुरकर ह्यांनी अनुवाद केलेल्या रिल्केच्या दहा पत्रांचे वाचन सुरू आहे. ग्रंथालीचं हे पुस्तक पाचेक वर्षांपूर्वी घेऊन ठेवलं होतं. ते वाचण्याची इच्छा मात्र आता झाली.
`जे होतं ते चांगल्यासाठीच!' कारण गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन झाल्यानंतर `हे' पुस्तक वाचायला जास्त छान वाटतंय!
नुकतीच इतरही काही पुस्तकांची माहिती कळली आणि ती लगेच मिळालीदेखील....
१. व्हिन्सेण्ट व्हॅन गॉच्या आठवणी - अनुवाद: अनिल कुसुरकर
२. चिं. त्र्यं. खानोलकर - ललित चरित्र - दीपक घारे
(दोन्ही पुस्तके ग्रंथाली प्रकाशन)
कलावंत कसा असतो / असावा ह्याविषयी रिल्केचे विचार समजून घेताना व्हिन्सेण्ट व्हॅन गॉ आणि चिं. त्र्यं. खानोलकर ह्या मनस्वी कलावंतांविषयी वाचायला मिळणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही.........

आरागॉर्न

आरागॉर्न · Sun, 27 Mar 2011 - 13:13

स्मोक अँड मिरर्स संपले. आता च्वाइस आहे.
१. काइट रनर - खालिद हुसेनी
२. बॅरिस्टरचं कार्ट - डॉ. हिम्मतराव बावस्कर

याखेरीज थोरोचे वाल्डेन अनपेक्षितपणे मिळाले. त्याचे रोज एक पान वाचायचा विचार आहे. प्रत्येक ओळ विचार करण्यासारखी असेल तर रोज एक पान पुरेसे व्हायला हरकत नसावी. :)

आनंदयात्री

आनंदयात्री · Sun, 27 Mar 2011 - 14:34 · उत्तर

मस्त !!

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sun, 27 Mar 2011 - 19:36 · उत्तर

आरागॉर्न,
थोरोचे वाल्डेन.....
तुम्ही दिलेल्या लिंकवर ह्या पुस्तकाची सविस्तर माहिती मिळाली, मनःपूर्वक धन्यवाद!
थोरोचे नेमके कोणते पुस्तक वाचावे, किंवा कोणत्या पुस्तकाच्या वाचनाने ह्या लेखकाला वाचायला सुरुवात करावी असा संभ्रम मनात गेले बरेच दिवस होता. तो मिटला.
ह्या पुस्तकाच्या रु.१२५ पासून रु.१५०० (अंदाजे) अशा वेगवेगळ्या आवृत्त्या flipkart.com वर बघायला मिळाल्या. त्यापैकी तुम्ही उल्लेख केलेली (जी तुम्हांला अनपेक्षितपणे मिळाली...) नेमकी कोणती आहे?

आरागॉर्न

आरागॉर्न · Mon, 28 Mar 2011 - 06:14 · उत्तर

मला मिळालेली प्रत बरीच जुनी आहे. (१९७८ची, बहुधा फ्लिपकार्टवर नसावी.)
मात्र वाल्डेन प्रताधिकारमुक्त असल्याने आंतरजालावरही उपलब्ध आहे.

यशोधरा

यशोधरा · Mon, 28 Mar 2011 - 08:08 · उत्तर

वाल्डेनचे डीटेल्स टाक म्हणणार होते, तितक्यात वाल्डेनचा दुवा पुरवल्याने तुम्हांला मनापासून दुवा! :)
धन्यवाद.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 28 Mar 2011 - 11:05 · उत्तर

आरागॉर्न,
तुम्ही मस्त आयती माहिती दिलीत त्यामुळे आंतरजालावरील हे पुस्तक लग्गेच Copy - Paste देखील करता आले. आता वाचनाचा मुहूर्त कधी मिळतोय बघू....

यशोधरा

यशोधरा · Mon, 28 Mar 2011 - 03:46 · उत्तर

काइट रनर - खालिद हुसेनी - वाचले आहे. :)

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Mon, 28 Mar 2011 - 15:02

आज बर्‍याच दिवसांनी ईकडे यायला वेळ मिळाला..
वाचन जोरदार चालु आहे सगळ्यांचेच...
सध्या तरी वाचनाला ब्रेकच आहे.

यशोधरा

यशोधरा · Mon, 28 Mar 2011 - 16:00

विस्मृतीचित्रे वाचून स्तिमित वगैरे काय म्हणतात, तसे झाले! अरुणा ढेरेंनी अत्यंत आत्मियतेने लिहिलेले पुस्तक आहे. आता ज्ञानदेवांचा आत्मसंवाद हे वि रा करंदीकरांचे अमृतानुभवावरील पुस्तक वाचत आहे.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 28 Mar 2011 - 19:09

यशोधरा,
अरे व्वा! विंदा करंदीकरांचे अमृतानुभव माझ्याकडे आहे. त्यातील ‘अहो ज्ञानदेवा....’ हे विंदांचे मनोगत मला खूऽऽऽप आवडले.
शिवाय जोगमहाराजांचे देखील अमृतानुभव आहे. पण ते वाचायला अजून सुरुवात केलेली नाही. ती करण्यापूर्वी तू सध्या वाचते आहेस ते ज्ञानदेवांचा आत्मसंवाद हे वि रा करंदीकरांचे अमृतानुभवावरील पुस्तक..... हे वाचावे का? तू काय सुचवशील?

यशोधरा

यशोधरा · Tue, 29 Mar 2011 - 07:56 · उत्तर

विंदांचे वा जोगमहाराजांचे मी वाचलेले नाही :( त्यामुळे तसे कसे सुचवू? - म्हणजे ही तीनही वाचलेली असतील तर जरातरी काही सुचवता येईल ह्या अर्थाने म्हणते :) तरीही माझ्या मते, प्रत्येक पुस्तक स्वतंत्ररीत्या वाचावे, जर भाग १,२ वगैरे नसतील तर. कोणत्याही आधी हे आणि नंतर ते, असे का करायचे? :) प्रत्येक पुस्तक ही स्वतंत्र कलाकृती नाही का? :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Tue, 29 Mar 2011 - 17:32

यशोधरा,
प्रत्येक पुस्तक ही स्वतंत्र कलाकृती असते हे खरे आहे. पण ज्ञानेश्वरांचे साहित्य वाचण्यापूर्वी पूर्वतयारी करावी लागते. आणि त्याकरता ज्ञानदेवांचा आत्मसंवाद हे वि रा करंदीकरांचे अमृतानुभवावरील पुस्तक उपयुक्त ठरेल असे मला वाटते.
त्याअर्थी तू काय सुचवशील असे मी विचारले, बस्स!

यशोधरा

यशोधरा · Tue, 29 Mar 2011 - 18:17 · उत्तर

मी काय सुचवू? मीच चाचपडते आहे..

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Wed, 30 Mar 2011 - 14:02 · उत्तर

यशोधरा,
म्हणूनच तर `पुस्तकविश्व'.....
एकमेकां साह्य करू!!!!!!!

चर्चा प्रकार