मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आनंदाचं पासबुक

इंग्रजी शीर्षक
Anandacha Passbook
सारांश

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. श्याम भुर्के यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये यशाची अनेक उत्तुंग शिखरे गाठली. साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली. वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, रणजित देसाई, जगदीश खेबूडकर, राम गबाले, भीमसेन जोशी, शरद तळवलकर, सुरेश भट, वामनराव चोरघडे, प्रा. शिवाजीराव भोसले अशा अनेक नामवंतांसंबंधीच्या आठवणी आनंददायी आहेत. डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या समाजकार्यात सहभागी होता आले. खुमासदार अत्रे, पु.ल. एक आनंदयात्रा, नंदादीप–वि.स. खांडेकर, साहित्यिक सावरकर, गोनीदां-एक झंझावात, व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट, मिरासदारी, शरद तळवलकर–गुदगुल्या असे हजारो कार्यक्रम पत्नीसमवेत करून ज्येष्ठ लेखकांचे साहित्य व जीवन रसिकांपर्यंत पोहोचविले. असं हे आनंददायी घटनांचं समृद्ध लिखाण आहे. ज्याला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं, यशस्वी व्हावंसं वाटतं, आनंदी रहावं वाटतं; त्याला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
320
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
9788184982022
समुदायाने जोडले
बंद