माझे शेल्फ
एकच पेला शिवाम्बूचा
निसर्गोपचारा संबंधीच्या अनेक प्रश्नांचा चिंतनशील व मार्मिक विचार या नाट्य-ग्रंथात सहज, सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. ते केवळ व्याधिग्रस्तांनीच वाचावे असे नाही, तर मुमुक्षूंनीही वाचावे. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीत्व हे तिच्या स्वास्थ्यानुरुप घडत असते आणि शुद्ध निसर्गोपचार हेच शिकवितो. सर्व लोकांना सर्व काळात उपयोगी पडणारा आणि सर्वत्र लागू होणारा असा हा निसर्गोपचार आहे. डॉ. शशि पाटील हे युरोपॅथिस्ट आहेत. ते मूत्रमार्गाने केल्या जाणाऱ्या उपचारांची नाट्यस्वरुपात माहिती देतात. मूत्र हा शब्दही माणसाला किळसवाणा वाटतो. पण त्या मूत्राचे नैसर्गिक महत्त्व डॅक्टर पटवून देतात. एका सत्यकथेवर आधारित ही नाटिका आहे. निर्सगोपचार उपचार पद्धतीने एका रुग्णाच्या आयुष्यात घडलेले बदल या साहित्यकृतीतून समोर येतात. त्यांचा निसर्गोपचार माणसाला खऱ्या अर्थाने निसर्गाच्या नजीक नेतो.