मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अंतरिक्षाच्या अंतरंगात
इंग्रजी शीर्षक
Antarikshachya Antarangat
सारांश
खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा झाल्यास किचकट गणित व भौतिकशास्त्र अशा गंभीर विषयांना तोंड द्यावे लागते. मात्र खगोलशास्त्रातील गणित व भौतिकशास्त्र वगळून जर त्यातील फक्त मनोरंजक माहिती मिळवायची इच्छा असेल, तर त्याने प्रस्तुत पुस्तक जरूर वाचावे. हलक्या फुलक्या भाषेत खगोलशास्त्राशी तोंडओळख करून देता देता लेखिका आपल्या सूर्यमालेतील सभासदांविषयी माहिती देते. तसेच सूर्यमालेबाहेरील विविध परग्रह, ते शोधण्याच्या पद्धती, तारे व ताऱ्यांचे रंग यासंबंधी माहिती देते. विविध प्रकारच्या दुर्बिणी, त्यातून होणारे ब्रह्मांडाचे दर्शन, गुरुत्वीय भिंगांसारखे चमत्कार, तर विश्वनिर्मितीसंबंधी अजूनही समाधानकारक विवेचन न मिळाल्याने शास्त्रज्ञांनी मांडलेले ‘बिग बँग’, ‘स्टेडी स्टेट युनिव्हर्स’ इ. सिद्धान्त विविध लेखांद्वारे लेखिकेने मांडले आहेत.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
140
भाषा
मराठी
किंमत
180.00
ISBN
9788184983234
समुदायाने जोडले
बंद