माझे शेल्फ
फिट फॉर ५०+ फॉर मेन
पन्नाशीचा गृहस्थ हा अठ्ठावीस वर्षांच्या जवानापेक्षा तंदुरुस्त असू शकतो. मध्यमवयाकडे झुकत असलेल्या पुरुषांसाठी फार साध्या आणि सोप्या भाषेत तंदुरुस्तीच्या व्यायामांची आखणी या पुस्तकात सादर केलेली आहे. पन्नाशीकडे झुकलेले पुरुष नेहमीच आपल्या स्वास्थ्याविषयी, फारच काळजी करताना आढळतात. याशिवाय व्यायामाच्या अभावामुळे ऑस्टओपोरॉसिसचा (हाडं ठिसूळ होण्याचा), दुसऱ्या क्रमांकाचा मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यांचा त्रास होण्याची शक्यता डोक्यावर सतत टांगत्या तलवारीसारखी असतेच. या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन पुरुषांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबिक्स, वजन उचलण्याचे व्यायाम, बळकटी वाढविण्याचे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. आयुष्याच्या वाटचालीत आपल्याला, आपलं आरोग्य आणि ऊर्जा गमावणं परवडणारं नाही. या पुस्तकात दिल्याप्रमाणे व्यायामाला लागा आणि आयुष्यभर निरोगी रहा. हा व्यायामाचा वास्तव, चपखल आणि संतुलित आराखडा आहे.