मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हृदयाचे पुनरुज्जीवन करणारे ई.ई.सी.पी. तंत्र

इंग्रजी शीर्षक
Hrudayache Punarujivan Karnare Eecp Tantra
सारांश

पेशंटच्या हृदयात अक्षरश: जान भरणारी शस्त्रक्रियाविरहित उपचारपद्धती ई.ई.सी.पी. म्हणजे एनहान्स्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन. ई.ई.सी.पी.बद्दल मी यापूर्वी का ऐकले नाही? साशंकता, क्षोभ, आश्चर्य व आनंद अशा संमिश्र भावना मिसळलेला हा प्रश्न हृदयरोगाचे पेशंट व स्नेहीजन सतत आम्हाला विचारत असतात. संपूर्ण रक्ताभिसरण संस्थेच्या कामाला चालना देऊन हृदयरोगावर उपचार करणारी ही शस्त्रक्रियाविरहित बाह्य उपचारपद्धती सर्वांना लाभदायक ठरावी. शंभरावर शोधनिबंधांमधून हिचे फायदे निर्विवाद पणे सिद्ध झालेले आहेत. अशी ही ई.ई.सी.पी. सर्वांपर्यंत पोहोचावी. बायपास-अँजिओप्लास्टीइतकीच कार्यक्षमता असणारी ई.ई.सी.पी. अनेक हृदयग्रस्तांना माहीत व्हावी हा या अनुवादामागचा मूळ हेतू आहे. ``मी अगदी याचीच वाट पाहत होते. मला एक नवजीवन मिळाल्यासारखं वाटतं आहे. अंजायना पूर्ण गायब झाला आहे. बरं झालं मी ई.ई.सी.पी. घेतली.`` मधुमेह, रक्तदाब व हार्ट फेल्युअरने त्रस्त असणाऱ्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या मॅडलिन बाईंचे उद्गार असंख्य हृदयरुग्णांना आशेचा किरण दाखवतील, अशी आशा आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
164
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9788184983982
समुदायाने जोडले
बंद