मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कविता स्मरणातल्या

इंग्रजी शीर्षक
Kavita Smaranatlya
सारांश

आवडलेल्या कवितांवरील शान्ताबाईचे सुंदर रसग्रहण. एक सुंदर स्वप्नरंजन....काही काळापूर्वी ‘अन्तर्नाद’ मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शान्ताबाई चालवत होत्या. आपल्याला आवडलेली, स्मरणात राहिलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दलचा रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे सदराचे स्वरूप होते. असे पंचवीस लेख त्या वेळी शान्ताबाईंनी लिहिले. ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकातून ते इथे प्रथमच एकत्रित स्वरूपात वाचकांसमोर येत आहेत. शान्ताबाईंचे कविताप्रेम सर्वज्ञात आहे. जुन्यानव्या कवितेचा त्यांचा व्यासंग गाढ; सर्वस्पर्शी आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. त्यामुळे त्यांचे हे काव्यविषयक लेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. कवितेवर मन:पूर्वक प्रेम करणाऱ्या रसिकांनाच नव्हे, तर कवितालेखन करणाऱ्या कवींनाही हे लेख कुतूहलजनक वाटतील. त्यांच्या पसंतीला उतरतील, यात शंका नाही....

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9788177667042
समुदायाने जोडले
बंद