माझे शेल्फ
क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता
जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाऱ्या भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच ‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं.