माझे शेल्फ
मिसफॉर्च्युन्स फेव्हरिट
सतराव्या शतकाच्या मध्यातील पार्श्वभूमीवर आधारित ही वेगवान कादंबरी मुघल सम्राट शाहजहानचा मोठा मुलगा आणि वारसदार दारा शुकोह याच्या आयुष्यातील शेवटच्या वर्षाची कहाणी जिवंत करते. शाहजहान गंभीर आजारी पडताच सत्तासंघर्षाचे ढग जमा होतात आणि सुजा, औरंगजेब व मुराद हे भाऊ दाराच्या अधिकाराला आव्हान देतात. राज्यकारभारापेक्षा धार्मिक संवादांमध्ये अधिक स्वारस्य असणारा दारा क्रूर औरंगजेबापुढे टिकाव धरू शकत नाही. सततचा पराभव आणि विश्वासाघात सहन करत पळणारा दारा अखेर पकडला जातो आणि त्याला प्राणाला मुकावे लागते. तरीही दाराचे जीवन व्यर्थ ठरले नाही; अलिमा मुलतानी यांनी भाकीत केल्याप्रमाणे औरंगजेबाचे शासन काही काळापुरतेच राहिले, तर दाराचे नाव मात्र शांततेचा राजकुमार म्हणून इतिहासात अमर झाले. `मिसफॉर्च्युन्स फेव्हरिट` ही निष्ठा, शौर्य आणि संघर्षासोबतच कपट व विश्वासाघाताने भरलेली एक चित्तवेधक ऐतिहासिक गाथा आहे.