मुखपृष्ठ

माझे शेल्फ

NISARGAPUTRA

इंग्रजी शीर्षक
Nisargaputra
सारांश

‘निसर्गपुत्र’ ही अ‍ॅड्रियन बोशियरच्या जीवनाचे सत्य सांगणारी कादंबरी. आई पुनर्विवाह करते,नवे वडील द. आफ्रिकेत कुटुंबास आणतात. तेव्हा १६ वर्षांचा ब्रोशियर दक्षिण आफ्रिकेतील रानावनात भटकून सत्य व खडतर अनुभव सोसतो. शिंगविहिन- प्रकरणात रक्ताला महत्त्व, त्यामुळे बोकड कापून बोशियरवर प्रथम धार्मिक विधी केला जातो. मोहलासाना: झुडुप- वाटेत दिसणार्‍या झाडांची, पाना-फुलांची औषधी माहिती बोशियर मिळवतो. मोरारा: महान वेल- सर्व प्रकारच्या मांत्रिकांना, वैदूंना वनऔषधींबद्दलचे ज्ञान असते. एका रुग्णाचा पाय कापायचे निदान होते, पण अतिमहत्त्वाच्या कामास तो रुग्णालयातून बाहेर पडतो व वैदू वनौषधीने त्याचा पाय न कापता बरा करतो. तेमोसो: पूर्वसूचना-आदिवासीं-वैदूंच्या ज्ञानातून पूर्वकल्पनेने दैनंदिन जगणे सोपे व आजारही बरे केले जातात. जमीन-भूमीला येथे महत्त्व. इ.स.१९२० मध्ये गर्टरूड कॅटन-थॉम्सन या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्तीने आफ्रिका पालथी घालून, नवे उत्खनन करून खरी संस्कृती जगापुढे आणली. ब्रोशियरनेही अल्प भटकंतीतून-जिव्हाळ्याने अभ्यास केला, म्हणूनच प्रो. रेमंड डार्ट यांनी आपल्या या हुशार शिष्याला नवदृष्टी-नवप्रेरणा व त्याच्या भटकंतीला योग्य दिशा दिली. या १६प्रकरणांतून निसर्गपुत्र बोशियरचे विश्वातील महान कार्य दिसते. हा निसर्गपुत्र आपली ‘जीवनगाथा’ लिहण्याचा प्रयत्न करतो; पण पोहताना अपस्माराच्या झटक्याने १९७८ ला त्याचे निधन होते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
156
भाषा
मराठी
किंमत
220.00
ISBN
9789357209465
समुदायाने जोडले
बंद