मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्रेमाची परिभाषा

इंग्रजी शीर्षक
Premachi Paribhasha
सारांश

१९३९ सालचा वसंत ऋतू. सुंदर तरुणी पामेला किराज, डोनाल्ड हिल या देखण्या पायलटला भेटते, आणि दोघे प्रेमात पडतात! पण दुस-या महायुद्धामुळे त्यांना त्यांचा विवाह लांबणीवर टाकावा लागतो. डोनाल्डची नेमणूक हाँगकाँगला होते. तेथे भविष्यातला संभाव्य धोका लक्षात घेऊन तो डायरी लिहायला सुरुवात करतो; पण त्यातला मजकूर असतो एका सांकेतिक भाषेत! ही भाषा असते रहस्यमय आकड्यांची! डोनाल्ड युद्धाहून परततो; पण युद्धकैदी असताना त्याचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ झालेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या मनावर, आयुष्यावर होतो. त्या आठवणी आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवतात. पामेलाला मनापासून वाटू लागते की, डोनाल्डला समजून घेण्यासाठी त्याच्या डायरीतील हे रहस्य समजून घेतलेच पाहिजे! हे रहस्यमय आकडे पामेलाला उलगडता येतील? डोनाल्डची ती सांकेतिक भाषा पामेलाला जाणून घेता येईल? आपल्या प्रेमाला जाणून घेण्याची, एका शोधाची ही सत्यकथा!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
268
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9788184984828
समुदायाने जोडले
बंद