मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रामायणातील पात्रवंदना

इंग्रजी शीर्षक
Ramayanatil Patravandana
सारांश

आपण सर्वच जण लहानपणापासून रामायणातील गोष्टी ऐकत मोठे झालो. आजही कॉमिक्स, पुस्तकं, टीव्ही, चित्रपट या सगळ्या माध्यमांमधून आपण लहानथोर सगळेच रामकथा बघत, वाचत असतो. फार थोड्यांना माहीत असेल की, भारतातील भाषांमध्ये व वेगवेगळ्या देशांमध्ये मिळून तीनशेच्या वर लहान मोठी रामायणं लिहिली गेली आहेत. बौद्ध, जैन, मुस्लिम रामायणंही आहेत! अर्थात मूळ अधिकृत ग्रंथ महर्षी वाल्मिकी लिखितच. बऱ्याचजणांना हे वाचूनही आश्चर्य वाटेल की वाल्मिकी रामायणाप्रमाणे श्रावणबाळाची कथा वेगळी आहे. जनक राजानं सीतेचं स्वयंवर मांडलंच नव्हतं, रावण अत्यंत विद्वान व धार्मिक शिवभक्त होता आणि कुबेराचा सावत्र भाऊ होता, लक्ष्मणानं ‘लक्ष्मणरेषा’ काढलीच नव्हती! आणि मुख्य म्हणजे रामायणातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वभाव, गुणदोष, कोणत्या घटनेत कोण कसं आणि का वागलं, विरोधाभास कोणते, या सर्वांचा आपण किती विचार करतो? या पुस्तकात तटस्थ भूमिकेतून, सर्वांबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही सर्व व्यक्ती व घटनांचं सुंदर विश्लेषण केलं आहे. ते वाचून, त्यावर विचार करून आपण केवळ अंधश्रद्धाळू न राहता डोळस आणि सश्रद्ध बनू शकतो. आपल्या संस्कृतीची भागीरथी असं रामचरित्र नव्यानं समजून घेऊया!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
180
भाषा
मराठी
किंमत
220.00
ISBN
9788184983036
समुदायाने जोडले
बंद