मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संस्मरणे

इंग्रजी शीर्षक
Sansmarane
सारांश

शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह. शांताबाईंचा हा आणखी एक लेखसंग्रह. इथे लिव उलमन या नामवंत चित्रपटतारकेच्या `चेंजिंग` या आत्मकथनाचे रसग्रहण आहे. त्याप्रमाणे `दैवलीला` या अगदी जुन्या काळातील एका मराठी लेखिकेच्या आत्मनिवेदनपर कादंबरीचा हृद्य परिचय आहे. गांधीजी आणि माधव जुलियन, तांबे आणि य.गो.जोशी, शरदचंद्र पुनर्वसू आणि ग. दि. माडगुळकर अशा भिन्न भिन्न प्रकारच्या व्याक्तीन्विशायीचे लेखन इथे आहे. त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या लेखानाबाद्दळी शांताबाई इथे मनमोकळेपणाने लिहितात. " उत्तर रामचरित " या सुप्रसिद्ध संस्कृत नात्याकृतीशी आपली हळूहळू होत गेलेली ओळख जशी त्यांनी इथे रसाळ पाने सांगितली आहे. त्याप्रमाणे बाळपणी वाचनात आलेल्या नाना प्रकारच्या पुस्तकांबद्दलही त्यांनी इथे निवेदन केले आहे. साहित्य आणि जीवन दोहोंबद्दलचे शांताबाईंचे उत्कट कुतूहल आणि त्यांची सर्वस्पर्शी रसिकता यांचा उत्तम प्रत्यय " संस्मरणे " मधील लेखांमधून वाचकांना येईल.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
148
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
9788171618309
समुदायाने जोडले
बंद