मुखपृष्ठ

माझे शेल्फ

श्रीमंत लोकांचे पाच नियम :

इंग्रजी शीर्षक
Shrimant Lokanche Pach Niyam
सारांश

सर्वसाधारणपणे समजलं जातं, तितकं काही श्रीमंत होणं कठीण नाही. वॉल्ट डिस्नेपेक्षा तर आपली परिस्थिती निश्चितच वाईट नसेल. ते इतके गरीब होते की, ते फाटकेच बूट घालायचे, कारण ते बूट शिवायलादेखील त्यांच्याजवळ पैसे नव्हते. धीरूभाई अंबानींपेक्षा आपली परिस्थिती नक्कीच चांगली असेल. ते एके काळी पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणाऱ्या पोऱ्याचं काम करत असत. आपली परिस्थिती अँड्र्यू कार्नेजीइतकी वाईट नाही. ते कधीकाळी हमाली करायचे. आणि हर्लेन सँडर्सपेक्षा तर आपली परिस्थिती वाईट असणारच नाही. कारण ते वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत दरिद्रीच होते. हे सगळे आणि यांच्याचसारखे इतर अनेक लोक विलक्षण अडचणी आणि संकटांचा सामना करूनच श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचले होते. कारण कळत-नकळत, त्यांनी श्रीमंत होण्याच्या नियमांचं पालन केलं होतं. खालील प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरता हे पुस्तक वाचा - हे लोक सामान्य परिस्थितीमध्ये राहत असूनही त्यांनी यशाचं शिखर कसं गाठलं? त्यांनी दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव आणि अपयशाचा सामना कसा केला? कुठल्या सवयींमुळे ते श्रीमंत होऊ शकले?

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
288
भाषा
मराठी
किंमत
400.00
ISBN
9788184983135
समुदायाने जोडले
बंद