ही वाट सूर गाते
इंग्रजी शीर्षक
Hee Waat Sur Gaate
सारांश
ही वाट सूर गाते सुधीर फडके आणि गजाननराव वाटवे यांचा सहवास लाभलेले, संगीत आणि कलेच्या विविध प्रांतात संवेदनशील मुशाफिरी केलेले श्रीपाद उंब्रेकर हे केवळ गायक नाहीत, तर अनुभवसमृद्ध साधक आहेत. स्वर, शब्द आणि संस्कार यांच्या संगतीत घडलेला त्यांचा प्रवास हा एका कलामनाचा शोध आहे. 'ही वाट सूर गाते' या पुस्तकातून उंब्रेकर आपल्या संगीत-प्रवासाकडे मागे वळून पाहतात. गुरुंचे सान्निध्य, संस्थात्मक कार्याची उभारणी, सांगीतिक उपक्रमांची धडपड, सहकाऱ्यांशी जुळलेली नाती आणि काळाच्या प्रवाहात बदलत गेलेले सांस्कृतिक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद