मुखपृष्ठ
Mardani Jhansiwali – Aapale Swatantra Senani

माझे शेल्फ

Mardani Jhansiwali – Aapale Swatantra Senani

इंग्रजी शीर्षक
Mardani Jhansiwali – Aapale Swatantra Senani
सारांश

छत्रपती शिवरायांची सून ताराराणी, इंदूरची अहिल्याबाई होळकर, कित्तूर संस्थानची राणी चन्नम्मा, झांशीची राणी लक्ष्मीबाई व अहमदनगरची चांदबीबी यांच्यात खूप साम्य आढळते. या सर्व जणी तथाकथित अबला व विधवा होत्या. त्यांच्यापैकी ताराराणी, अहिल्याबाई व चांदबीबी यांचा संघर्ष स्वकीयांशी होता, तर चन्नम्मा व लक्ष्मीबाई यांचा संघर्ष हा परकीयांशी इंग्रजांशी होता. या दोघींना त्यांच्या पतिनिधनानंतर दत्तकाचा हक्क नाकारला गेला होता. दोघींनी पराक्रमाची शर्थ केली. चन्नम्मा लढाईत हरली, तर लक्ष्मीबाईंनी लढता लढता हौतात्म्य स्वीकारले. कित्तूरची चन्नम्मा व झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर कवने, पोवाडे रचले गेले. दोघी जणी दंतकथा बनल्या. चन्नम्मांचे नाव दक्षिण भारतापुरतेच सीमित राहिले, तर राणी लक्ष्मीबाईंचे नाव भारतभर दुमदुमत राहिले आहे व राहणार आहे. अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या अल्प आयुष्यात लक्ष्मीबाई लख्कन तळपून जाणार्‍या विजेसारख्या चमकून गेल्या. सर्वांचे डोळे दिपवून गेल्या.

मर्दानी झांसीवाली – आपले स्वातंत्र्या सेनानी | विठ्ठलराय भट

Mardani Jhansiwali – Aapale Swatantra Senani | Vitthalrai Bhat

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
64
भाषा
मराठी
किंमत
48.00
ISBN
978-93-87667-67-9