मुखपृष्ठ
Jagana Vechatana

माझे शेल्फ

Jagana Vechatana

इंग्रजी शीर्षक
Jagana Vechatana
सारांश

या हकिकती आहेत; पण जसं घडलं त्याचं हे रिपोर्टिंग नाही…

कष्टकरी माणसं परिस्थितीत जेव्हा जाणीवपूर्वक बदल घडवायला

पुढे येतात तेव्हा ठप्प वाटणारी परिस्थिती हलायला लागते…

न्याय कशाला म्हणायचं, अन्याय कशाला म्हणायचं हे ठरवण्याचाही

एक प्रवास सुरू होतो.

बहुसंख्य माणसांची न्यायबुद्धी जर सतेज झाली, जागी झाली,

क्रियाशील झाली तर अन्याय्य परिस्थिती रोखायला ते पुढे येतील.

या सगळ्या हालचाली केवळ प्रासांगिक न राहता एक जाणीवपूर्वक

ताकदीचा प्रवाह आकाराला येऊ शकेल. व्यक्तिगत पातळीवरच्या

किंवा संघटित पातळीवरच्या अशा धडपडींना शब्दरूप दिलं गेलं पाहिजे.

एकमेकांशी संपर्क वाढले पाहिजेत. कदाचित यामुळेच तळागाळातल्या

कष्टकऱ्यांना स्वत:च्या मुक्तीचा मार्ग सापडेल.

हे सर्व लिखाण त्यासाठी मदतकारक व्हावं हीच इच्छा आहे.

मुक्ता मनोहर

1975 पासून डाव्या चळवळींमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ती. सध्या पुणे मनपा

कामगार युनियन, श्रमिक महिला मोर्चा, महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघ,

क्रांतिवीर भगतसिंह ब्रिगेड अशा विविध जनसंघटनांत पदाधिकारी म्हणून

कार्यरत.

प्रकाशित पुस्तके : ‌‘मराठी नाटकातील स्त्री प्रतिमा‌’, 1988.

अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यांतून सातत्याने सामाजिक व राजकीय

विषयांवरील लेखन, तसेच कथा व नाट्यलेखन. भोपाळ दुर्घटनेवरील दोन

अंक नाटकाचे दलित रंगभूमीकडून सादरीकरण.

मार्क्सवादी व डाव्या विचारांशी बांधिलकी. ‌‘कचरा कोंडी‌’ या माहितीपटाच्या

निर्मितीत व संहितालेखनात विशेष सहभाग.

Jagana Vechatana | Mukta Manohar

जगणं वेचताना । मुक्ता मनोहर

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
196
भाषा
मराठी
किंमत
239.20
ISBN
978-93-80264-51-6