माझे शेल्फ
समग्र एकांकिका : भाग २
Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर) : Samagra Ekankika : Bhag 2 (समग्र एकांकिका : भाग २) समग्र एकांकिका : भाग – २ विजय तेंडुलकर विजय तेंडुलकरांच्या नाटकांत, एकांकिकांत नाट्याशयाबरोबरच तंत्र व शैलीमध्ये वेगळेपणा आणणारी, पारंपरिक नाट्यतंत्राची मोडतोड करून नावीन्य शोधणारी, विषयातला वेगळेपणा पोसणारी, सुंदरतेबरोबरच कुरूपतेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी त्यांची प्रतिभा निरनिराळे प्रयोग करीत परखड वास्तव आपल्यासमोर आणत राहते. अशा कलाकृतींच्या शोधात असलेल्या कलावंताना, नाट्यसंस्थांना, अभ्यासू-जिज्ञासू वाचकांना सातत्याने नवीन अनुभव देणाऱ्या या एकांकिका तीन भागांत एकत्रित मिळण्याचा योग आला आहे. दुसऱ्या भागात ‘अजगर आणि गंधर्व’, ‘भेकड’ यांसारख्या कारुण्यरसविशेषांनी युक्त प्रासंगिकताप्रधान विशेषतः स्त्रीसमस्याप्रधान आणि ‘दाणादण ‘सारख्या विनोदी परिणामांवर भर देणाऱ्या एकांकिकांचा समावेश केला आहे. या भागातील एकांकिका अजगर आणि गंधर्व बेबी भेकड गोष्ट एक अशी परी बळी एक अशी परी समोरचा नाडकर्णी दो जिवांची एकता