मुखपृष्ठ
आहारातुन उपचार – आरोग्यदायी आहाराचा मूलमंत्र

माझे शेल्फ

आहारातुन उपचार – आरोग्यदायी आहाराचा मूलमंत्र

सारांश

Aaharatun Upchar (आहारातुन उपचार – आरोग्यदायी आहाराचा मूलमंत्र) : Dr. Anjali Mukerjee / Tr. Sunanda Amrapurkar (डॉ. अंजली मुखर्जी / अनु. सुनंदा अमरापूरकर) आरोग्य आणि पोषक आहार’ यांचे दुसरे नाव म्हणजे डॉ. अंजली मुखर्जी. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अॅप्लाईड न्यूट्रिशन’ मधून ‘अन्न आणि आहारशास्त्र’ याविषयी विशेष अध्ययन केले. १९८४ पासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यानंतर त्यांनी पर्यायी वैद्यकशास्त्रात एम. डी. पदवी प्राप्त केली. गेली अनेक वर्षे त्या वैद्यकीय व्यवसायात सक्रिय आहेत. पती सौरभ यांच्या सहकार्याने १९९७ मध्ये ‘अंजली मुखर्जी हेल्थ टोटल’ नावाची स्वतःची कंपनी त्यांनी सुरू केली आणि मुंबईत त्यांची दोन आरोग्य केंद्रे सुरू झाली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत त्यांनी फक्त आपला ग्राहकवर्गच वाढवला असे नाही तर मुंबईभरात त्यांची एकूण सहा केंद्रे सुरू केली. सदरलेखिका म्हणून ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये त्यांनी बरेच लेखन केले आहे. तसेच ‘फेमिना’, ‘एलान’, ‘गृहलक्ष्मी’ यांतही त्यांचे लेख छापून येतात. ‘एशिया वीक’ या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय मासिकातील लेखात ‘आशियामधील आघाडीची आरोग्य प्रचारक’ असा त्यांचा गौरवपर उल्लेख करण्यात आला आहे. विमेन अचिव्हर्स अवॉर्ड, तसेच आहार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आय. जे. एम. पुरस्कारासह ‘भारत निर्माण’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी त्यांच्या कंपनीने अनेक ‘आरोग्य महोत्सव’ आयोजित केले. या क्षेत्राबद्दल त्यांना असणारे सम्यक ज्ञान आणि त्यांनी केलेले प्रचंड काम लक्षात घेऊन त्यांना ‘फेमिना मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेसाठी ‘अधिकृत आहारतज्ज्ञ’ म्हणून नेमण्यात आले. ‘प्रतिबंधक आरोग्यसेवा’ (प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर) या विषयात संशोधन करून त्यांनी सुरू केलेल्या ‘विनाऔषध उपचारपद्धती’चा जवळ जवळ वीस हजार रुग्णांनी लाभ घेतलेला आहे. वाढलेलं कोलास्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यांवर वनौषधी, आहारतून उपचार, पूरक आहार आणि व्यायाम यांद्वारे त्यांनी अनेकांना बरे केलेले आहे. सौरभ यांच्या सहकार्याने दीर्घकाल संशोधन करून ‘अंजली मुखर्जी हेल्थ टोटल’ चे खाद्यपदार्थ बनवण्यात आले जे देशभर लोकप्रिय ठरले आहेत.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
302
भाषा
मराठी
किंमत
550.00
ISBN
9788171855469
समुदायाने जोडले
बंद