मुखपृष्ठ
Jwalamukhi

माझे शेल्फ

Jwalamukhi

इंग्रजी शीर्षक
Jwalamukhi
सारांश

पृथ्वीवर प्रचंड विस्तार असलेले महासागर आहेत, हिमाच्छादित शिखरे असणारे पर्वत आहेत, हिरवीगार जंगले, कुरणे-शेतमळे आहेत. पण अचानक एखाद्या जागी जमिनीतून तर कधी उंच पर्वतावरून, तर कधी एखाद्या टेकाडावरून आगीचा लोळ उठतो, आग, धूळ आणि धूर मोठा आवाज करत त्या उद्रेकातून बाहेर पडतात. काही काळ ही आतशबाजी सुरू राहते, मग तप्त शीलारसाचे, लाव्हाचे ओढे वरून खाली वाहत येतात. जे काही वाटेत येईल त्याची राख करत त्याला गाडून टाकत हा लाव्हा पुढे जात राहतो. लाव्हा थंड होऊन त्याचे दगडी आवरण आसपासच्या प्रदेशावर पडल्यावरच हा प्रकार थांबतो. हे सारे नुसते भीतिदायक नाही, तर हे उद्रेक तिथे आणि आसपास असणाऱ्या सगळ्या ‘आहे चे नाही’ करून टाकतात.

ही एवढी आग डोंगराच्या आतून बाहेर येतेच कशी ? ती आधी असते कुठे ? ती का बाहेर येते ? हे पश्न पडणे साहजिकच आहे. पण त्याचे योग्य वैज्ञानिक उत्तर मिळण्यासाठी शास्त्रज्ञ आजही जीव धोक्यात घालून प्रयोग करत आहेत. काही ठिकाणी यासाठी उत्खननही केले गेले आहे. आजही असे ज्वालामुखीचे उद्रेक काही ठराविक ठिकाणी होताना दिसतात. काय वेगळे आहे त्या जागांमध्ये ? हे उद्रेक कधी होतात ते सांगता येईल का ?

अशा प्रश्नांची समर्पक वैज्ञानिक उत्तरे असणारे, ज्वालामुखींच्या शोधांबद्दलची सचित्र माहिती देणारे हे पुस्तक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनाही उपयुक्त ठरेल. आपल्या विज्ञान विषयाच्या ग्रंथसंग्रहात कायमची मोलाची भर घालणारे ठरेल.

ज्वालामुखी – आनंद घैसास

Jwalamukhi – Anand Ghaisas

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
32
भाषा
मराठी
किंमत
72.00
ISBN
978-81-95235-01-8