मुखपृष्ठ
मराठेशाहीचे सरसेनापती खंड 2

माझे शेल्फ

मराठेशाहीचे सरसेनापती खंड 2

इंग्रजी शीर्षक
Maratheshahiche Sarsenapati Khand 2
सारांश

हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे एक खंबीर व्यक्तिमत्त्व होते. शिवराज्याभिषेकापासून जालना मोहिमेपर्यंत हंबीररावांची कामगिरी खूप महत्त्वाची होती. शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती शंभू महाराजांना साथ देऊन मुघलांचा थरकाप उडवणाऱ्या हंबीररावांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.

हंबीरराव मोहितेंच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे पाचवे सरसेनापती होण्याचा मान म्हाळोजी घोरपडे यांना मिळाला. म्हाळोजी घोरपडे यांच्या काळात स्वराज्यावर चारही बाजूंनी संकटे आली. त्या संकटांना त्यांनी यशस्वीपणे तोंड दिले. शेख निजामाने छत्रपती शंभू महाराजांना चारही बाजूंनी घेरले असताना आपल्या छत्रपतींना वाचवण्यासाठी सरसेनापती म्हाळोजी घोरपडे धारातीर्थी पडले. हिंदवी स्वराज्य व छत्रपती यांना वाचवण्यासाठी छातीचा कोट करून धारातीर्थी पडलेले वीर म्हणजे सरसेनापती म्हाळोजी घोरपडे होत. सरसेनापती खंड २ मध्ये हंबीरराव मोहिते व म्हाळोजी घोरपडे यांच्या शौर्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
250.00
ISBN
9788169565035