जेपीज भटकंती टिप्स
सुनियोजित व सुखकर भटकंतीसाठी अनुभवाचे बोल
जयप्रकाश प्रधान
जयंती प्रधान
प्रवासाचं वेड कुणाचं आयुष्य कसं बदलून टाकू शकतं याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर जेपीज्अर्थात जयप्रकाश व जयंती प्रधान दाम्पत्याचं
!
१९९८मध्ये या दाम्पत्याने युरोपची पहिली सहल केली आणि त्यानंतर झपाटल्यासारखे ते एका मागोमाग एक देश पालथे घालू लागले
.
आजपर्यंत त्यांनी तब्बल ७८ देशांची सैर केली आहे
.
या ऑफबीट भटकंतीमधून ‘जेपीज्
‘
कडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जमा झाले
.
या अनुभवांमधूनच पर्यटनाबद्दलची एक व्यापक दृष्टी निर्माण झाली
.
सहल प्लॅन करताना कोणत्या गोष्टी कराव्यात
,
कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे त्यांना उत्तमरीत्या समजून आलं
.
त्यातूनच नियोजनाच्या उपयुक्त टिप्सचं हे पुस्तक साकार झालं आहे
.
या टिप्समुळे सहल आनंददायी आणि निर्विघ्न होईल
.
एक सुजाण पर्यटक म्हणून आपला दृष्टीकोन विकसित होईल
.
तसंच परदेशात आपण कोणत्या गोष्टी कराव्यात
,
कोणत्या टाळाव्यात याबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या देशाची प्रतिमाही चांगली ठेऊ शकतो
.