मुखपृष्ठ
अमावास्येचा पूर्णचंद्र

माझे शेल्फ

अमावास्येचा पूर्णचंद्र

इंग्रजी शीर्षक
Amavasyecha Poornachandra
सारांश

अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा – विदेशातील विविध छटांमधील ग्रहणं बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती ! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं- वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी . त्यावेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरशः झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन ग्रहणं अनुभवली . त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्भुत नाट्य . ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं पण मन मात्र भरत नाही . हुबळी , डायमंड हार्बर , कच्छ , झांबिया , द . आफ्रिका , टर्की , चीन , रामेश्वरम् अशा देश – विदेशातील अनेक ठिकाणी त्यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा जणू पाठलागच केला ! ते स्वत : खगोलशास्त्रज्ञ नाहीत किंवा अंतराळशास्त्रज्ञही नाहीत . तरीही एखाद्या निरागस पण जिज्ञासू वृत्तीच्या मुलाप्रमाणे ते ग्रहणाचं रोमांचपूर्ण वर्णन करतात . ग्रहणाच्या पहिल्या स्पर्शापासून ते ग्रहण सुटेपर्यंतच्या काळाचं वर्णन वाचताना वाचकाला स्वत : ग्रहण अनुभवत असल्याचा आनंद देऊन जातात . लागू देश – विदेशात भरपूर फिरले , मात्र नेहमीच्या पठडीतील पर्यटनासाठी म्हणून ते फिरले नाहीत . त्यांची भटकंती झाली ती कधी जलतरणस्पर्धेच्या निमित्ताने तर कधी नाट्यप्रयोगांसाठी , कधी कैलास – मानससरोवराची प्रदक्षिणा करायला , कधी एव्हरेस्ट बेसकॅप सर करण्यासाठी तर कधी अद्भुत शांततेने आणि केवळ बर्फाने आच्छादलेला सातवा खंड – ‘ अंटाटिका ‘ अनुभवण्यासाठी मात्र या पुस्तकातील भटकंती आहे ती फक्त आणि फक्त ग्रहणं बघण्यासाठीची …

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
पृष्ठसंख्या
108
भाषा
मराठी
किंमत
125.00
ISBN
9789382591085