मुखपृष्ठ
भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव

माझे शेल्फ

भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव

सारांश

भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग

▪️गेट फोल्ड । साईज : A/4 । रंगीत आर्टपेपरवर संपूर्ण छपाई

* कला : दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम

* कथा : श्रीविद्या नटराजन, एस. आनंद

* मराठी अनुवाद : अल्पना कुबल

***

भारतात अस्पृश्य असण्याचा काय अर्थ होतो ? काही भारतीयांना इतरांच्या स्पर्शाची घृणा का वाटते? भारतातल्या आद्य क्रांतिकारकांपैकी एक असलेले भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६), एक अस्पृश्य म्हणून वाढताना पदोपदी आणि ठायीठायी वाट्याला आलेल्या भेदभावाचे स्वतःचे कटू अनुभव सांगत आहेत : वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असतानाचे, कोलंबिया विद्यापीठातून परतल्यानंतर बडोद्यातले आणि प्रवासातले.

साऱ्या प्रतिकूलतेवर मात करत आबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि अखेरीस बौद्ध धर्म स्वीकारला. भारतातील १७ कोटी दलितांपैकी अनेकांना आंबेडकरांसारखे अनुभव पुन्हा-पुन्हा येणे सुरूच आहे. आजही त्यांना पाणी, निवारा आणि आयुष्यातली मूलभूत प्रतिष्ठा नाकारली जात आहे.

या सृजनशील आणि नावीन्यपूर्ण पुस्तकात प्रधान-गौंड कलाकार दुर्गाबाई व्याम आणि सुभाष व्याम है महाड सत्याग्रहासारख्या ऐतिहासिक घडामोडी आणि समकालीन घटना एकमेकांत गुंफतात. पारंपरिक नियम धुडकावून लावत त्यांची अद्भुत कला एका महाकथेसाठी सादर करताना ग्राफिक चित्रणकलेला एक नवीन ऊर्जा प्रदान करतात.

भारतातल्या सर्वात महत्त्वाच्या विचारवंतांपैकी एक असलेले भीमराव रामजी आंबेडकर यांचे जीवनचरित्र अनेक दशके जाणूनबुजून एका बाजूला सारण्यात आलेले आहे. विलक्षण सुंदर रीतीने ‘भीमायन’ ते आपल्याला पुन्हा सांगते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
200.00