मुखपृष्ठ
बारा भाषणे

माझे शेल्फ

बारा भाषणे

सारांश

राजकीय नेत्यांच्या हृदयात जनतेची खरी आस्था असण्याचे दिवस बहुतेक संपले, असं म्हणत असताना ‘बारा भाषणे’ सारखं पुस्तक जेव्हा हातात येतं, तेव्हा काळाच्या पलीकडे गेलेला एक राजकीय नेता सामाजिक बांधिलकी मनात धरून किती सच्चे बोल बोलतोय हे लक्षात येतं. त्या राजकीय नेत्याचं मोठेपण हे फक्त सच्च्या बोलांवरच आधारित नसून त्याच्या सखोल अभ्यासावर कसं आधारलेलं आहे हेही लक्षात येतं. त्याच्या अभ्यासाचा आवाका किती विलक्षण आहे; भारताच्या इतिहासाचं आणि त्यात झालेल्या घडामोडींचं विश्लेषण किती बारकाईने केलंय हे या भाषणांतून दिसतं. हे पुस्तक त्या वेगळ्याच धाटणीच्या नेतृत्वाचं प्रतीक आहे. कॉम्रेड डांग्यांनी ज्या इतिहासाचं नेतृत्व केलं, त्या इतिहासाचं प्रतीक आहे.

– रोहिणी भट साहनी, प्रस्तावनेतून

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
172
भाषा
मराठी
किंमत
200.00