मुखपृष्ठ
माणूसपणाच्या जाणिवा विस्तारणारा चित्रकार : सुधीर पटवर्धन

माझे शेल्फ

माणूसपणाच्या जाणिवा विस्तारणारा चित्रकार : सुधीर पटवर्धन

सारांश

सुधीर पटवर्धन यांचा जन्म १९४९ साली पुण्यात झाला. त्यांनी वैद्यक पदवी प्राप्त केली असून २००५ पर्यंत ठाणे शहरात क्षकिरणतज्ज्ञ ( रेडिओलॉजिस्ट) म्हणून व्यवसाय करत होते.

१९७९ साली त्यांच्या कलाकृतींचं पहिलं एकल प्रदर्शन झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, बंगलोर व ठाण्यात त्यांची अनेक एकल प्रदर्शनं झाली आहेत. इंग्लंड व अन्य युरोपीय देश, अमेरिका व जपानमध्ये वेळोवेळी प्रदर्शित झालेल्या समकालीन भारतीय कलेशी संबंधित महत्त्वाच्या प्रदर्शनांमध्ये पटवर्धनांच्या कलाकृतींचा समावेश झालेला आहे. त्यांच्या कलाकृतींना समीक्षकांची मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळाली असून ते भारतातील एक आघाडीचे कलावंत मानले जातात.

सुरुवातीपासूनच सामान्य माणसाचं जगणं त्यांच्या कलेच्या केंद्रस्थानी आहे. कलाप्रवासाच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांच्या कलेचा अनेक अंगांनी विकास झाला असून त्यांच्या आस्थेच्या विषयांमध्ये अधिकाधिक सघनता व परिपक्वता आली आहे. या प्रख्यात कलावंताच्या कलाकारकिर्दीच्या विकासाचा आढावा या पुस्तकाद्वारे घेण्यात आला असून गेल्या तीस वर्षांतील त्यांच्या महत्त्वाच्या कलाकृतीही या ठिकाणी सादर केल्या आहेत.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
96
भाषा
मराठी
किंमत
500.00