मुखपृष्ठ
इर्जिक

माझे शेल्फ

इर्जिक

सारांश

इर्जिक म्हणजे समूहमनाचा आविष्कार! लोकसंस्कृती, कृषिजीवन आणि ग्रामव्यवस्था यांचा अतिशय सखोल, सशक्त आणि तेवढाच ललितरम्य आविष्कार या सर्व लेखांतून व्यक्त झाला आहे. एका अर्थाने हा ग्रामजीवनाचा सांस्कृतिक व वैचारिक / सामाजिक दस्तऐवज आहे.

ग्रामजीवनाशी निगडित असलेल्या अनेक गोष्टींचा अरुण जाखडे यांनी मनोज्ञ परिचय घडविला आहे. प्रथम ते निसर्गाचे प्रत्ययकारी दर्शन घडवितात, नंतर निसर्गनिगडित कृषिजीवनाचे चित्रण करतात. यानंतर कृषिजीवनाशी संबंधित असलेल्या बाबींचे दर्शन घडवितात. शेती-मातीचे, कृषिजीवनाचे, सण-सोहळ्याचे आणि ग्रामव्यवस्थेचे इतके सूक्ष्म, तपशीलवार आणि रसिले चित्रण ते करतात, जे मराठी साहित्यात फार अभावाने आले आहे, कृषिजीवनातील रंग, ताल, लय, नाद, स्वाद त्यांनी अचूक टिपले आहेत.

आपल्या अनुभवाला जाखडे यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या सखोल आणि चौफेर ग्रंथव्यासंगाची जोड दिली आहे. त्यामुळे हे लेखन व्यासंगपूर्ण झाले आहे आणि हेच जाखडे यांचे वैशिष्ट्य आहे. जाखडे यांच्याजवळ असणारे समृद्ध भूमिप्रेम, निसर्गप्रेम या सर्व लेखांतून स्पष्ट झाले आहे.

एका भूमिपुत्राचे हे इर्जिक म्हणूनच स्वादिष्ट झाले आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
184
भाषा
मराठी
किंमत
200.00