मुखपृष्ठ
मराठी कवितेच्या नव्या दिशा

माझे शेल्फ

मराठी कवितेच्या नव्या दिशा

सारांश

माणसाचे गाणे गाणाऱ्या बहुजन परंपरेचा मूल्यव्यूह दलित कविता स्वीकारते आणि वैचारिक / सामाजिक उत्थानासाठीच्या चिवट झुंजीचे संघर्ष वर्तमान भूमीवर उभे राहण्याची आवश्यकता प्रतिपादन करते. परिवर्तनाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीशी या कवितेने आपले नाते जोडल्यामुळे ती अधिक व्यापक झाली आहे. सांस्कृतिक काळवंडलेपणाच्या पार्श्वभूमीवर उजेडाची, मानवतेच्या तेजस्वितेची पखरण करणाऱ्या या माणूसकेंद्री कवितेने माणसाच्या जीवनाचे सुंदर तत्त्वज्ञान मांडले आहे. माणसाच्या प्रज्ञावान आणि प्रकाशमान हातामुळेच अनेक चमत्कार या पृथ्वीवर घडले आहेत अशा विश्वासातून ही कविता विध्वंसकता आणि विधायकता यामधील नेमका फरक विषद करते. जेव्हा समाजात अमानुषता वाढत जाते त्या वेळेस कवितेवर अधिकच जबाबदारी येऊन पडते. समाजसंस्कृती जेव्हा मूल्यहासाच्या कड्यावर उभी असते तेव्हा मानवतावादी मूल्यांच्या आधारेच समाजाची घडी बसवण्याचे कार्य काळाच्या पार्श्वभूमीवर पार पाडावे लागते. रूढी-परंपरांचे बांध फोडल्याशिवाय माणुसकीचे प्रवाह मोकळे होत नसतात. म्हणून एक झंझावाती आवेग आणि सळसळती नाट्यात्मकता या कवितेत अवतरते. माणसाने माणसावर प्रेम करावे या जाणिवेच्या प्रगल्भतेतूनच बंधुत्वाचे प्रदेश विस्तारत जाणार आहेत याचे भान ठेवून प्रेमाच्या सार्वत्रिकीकरणाची आवश्यकता विषद करणे या कवितेला महत्त्वाचे वाटते.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
226
भाषा
मराठी
किंमत
225.00