मुखपृष्ठ
निद्राहीन रात्रीच्या कठोर कातळावर : निवडक रजनी परुळेकर

माझे शेल्फ

निद्राहीन रात्रीच्या कठोर कातळावर : निवडक रजनी परुळेकर

सारांश

रजनी परुळेकरांची कविता ही प्रामुख्याने जगण्यावर भाष्य करते, कवयित्री हे जगणं स्त्री म्हणून जगतेच पण त्याचबरोबर माणूस म्हणूनही जगते आहे, असं जगताना या जगाचे, त्यातील माणसांचे आलेले अनुभव, विविध नातेसंबंध, त्यांतले ताग या सगळ्यातून ही कवयित्री सतत स्वतःला शोधत राहते. स्वतःकडे त्रयस्थपणे पाहताना कधी स्वतःलाच टीकेचे लक्ष्य करते, तर कधी स्वतःला तपासून पाहते. आपण असहाय, एकट्या आहोत या भावनेने ती अस्वस्थ होते तर कधी या एकटेपणातून बाहेर येण्याचे नवे मार्ग शोधत राहते. या कवयित्रीच्या कवितेतून व्यक्त होणारे अनुभव हे स्त्रीनिष्ठ असल्याने या सान्याच अनुभवांमुळे अस्वस्थ झालेली ती या समाजावर, त्यातील पुरुषप्रधान व्यवस्थेवर टोकेचं अखही सोडते.

नी परुळेकर स्त्रीवादी असल्या तरी ‘पुरुष नाकारणाऱ्या स्त्रीवादाच्या एका शाखेच्या समर्थक नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. स्त्रीवाद हा मानवतावादाकडे नेणाराच आहे आणि तोच त्यांना अभिप्रेत आहे. म्हणून स्त्रीला माणूस म्हणून न वागवणाऱ्या पुरुषांविषयी ठासून भरलेला संताप त्यांच्या कवितेतून एकीकडे व्यक्त होतो, तर दुसरीकडे मैत्रीचा हात पुढे करणाच्या स्त्रीला समजून घेणाच्या, तिचा राग- लोभ सहन करणाऱ्या पुरुषाविषयी त्या प्रेम, आदर, ममत्वही व्यक्त करतात.

रजनी परुळेकर एक कवयित्री म्हणून या साऱ्याच अनुभवांकडे इतक्या वेगवेगळ्या नजरेने पाहतात की त्यांची कविता व्यक्तिनिष्ठ असली तरी अनेकदा ती हे व्यक्तिनिष्ठतेच रिंगण सोडून सार्वत्रिक होऊन जाते.

– नीरजा ( प्रस्तावनेतून )

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
किंमत
200.00