लल्ला
सारांश
लल्लेश्वरीचा जन्म इ.स. १३०१ ते १३२० च्या दरम्यान झाला असावा असे मानले जाते. प्रसिद्ध इंग्रजी साहित्याचे समीक्षक रणजित होस्कोटे यांच्या लिल्ला दे’ या पुस्तकातील काही संदर्भ आधारासाठी घेऊन संध्या सप्रे यांनी ही कादंबरी लिहिली आहे. लेखिकेने लल्लेश्वरीच्या अतिशय जुजबी, त्रोटक चरित्राच्या आधारे, केवळ तिच्या रचनांचा अनुवाद वाचून तिचे व्यक्तिमत्त्व मार्मिक रीतीने रेखाटले आहे.
‘जाणिवा विकसित होताना…’ या डॉ. अरुणा ढेरे लिखित, पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात भारतातील अनेक संतकवयित्रीचा संदर्भ आला आहे. त्यात लल्लेश्वरीचीही त्रोटक माहिती आहे. परंतु स्वतंत्रपणे परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लल्लेश्वरीवर लिहिलेली ही मराठीतील पहिलीच कादंबरी आहे, तिचे वाचनीय मूल्य लक्षणीय आहे.
– डॉ. मीनाक्षी दादरावाला