मुखपृष्ठ
अस्तित्वाची शुभ्र शिडे

माझे शेल्फ

अस्तित्वाची शुभ्र शिडे

सारांश

अस्तित्वाची शुभ्र शिडे’ हा नागनाथ कोतापल्ले यांच्या दीर्घ कथांचा संग्रह. या कथांमधून माणसाचे उन्नयन घडविणारी जीवनमूल्ये आणि हितसंबंधांची घट्ट होत जाणारी पकड यातील सनातन संघर्ष प्रत्ययाला येतो. हा संघर्ष आज अधिकच जीवघेणा झाला आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. किंबहुना मानवी अस्तित्वच आज पणाला लागले आहे. पणाला लागलेल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या या कथा आहेत. अस्तित्व शोधाच्या या कथा असल्यामुळे त्या सार्वकालीक जीवनाचा शोध घेणाऱ्या कथाही होऊन जातात. चाकोरीबाहेरचे अनुभव विश्व, जीवनाचा व्यापक पट उलगडत जाणे आणि प्रयोगशिलता यामधून या कथा अधिक प्रत्ययकारी होत जातात. तसेच परिवर्तनवादी विचारांशी असलेल्या घट्ट बांधिलकीमुळे या संग्रहातील कथा जगण्यासंबंधीचे एक नवेच भान देतात आणि वाचकांना अंतर्मुखही करतात.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
240
भाषा
मराठी
किंमत
300.00