मुखपृष्ठ
भटक्या

माझे शेल्फ

भटक्या

इंग्रजी शीर्षक
Bhatkya
सारांश

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले. "मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - भटक्या हरिभाऊंची आशयसीमा जिथे संपते, तिथून केतकरांची लेखनसीमा सुरु होते:हे त्यांच्या समग्र कादंबरीविश्वाबाबत खरे आहे;अगदी "भटक्या " (१९३८) या अपूर्ण कादंबरीबाबतही. पात्रमुखी शैलीत असूनही प्रस्तुत कादंबरी भावप्रधान नसून चर्चाप्रधानच आहे. निनावी नायकाच्या देशी-परदेशी भटकंतीतून लेखकाने कुटुंब - समाज - राजकारण यांचा उभा छेद उभा केला आहे:त्यातून विविध प्रसंग आणि विविध स्तरांतील पात्रे यांचे दर्शन घडते. आजच्या वृतान्त कादंबऱ्यांची गंगोत्री म्हणून केतकरांच्या सर्वच कादंबऱ्यांकडे - व - अर्थात - "भटक्या " कडे पाहता येईल!- डॉ. द. भि. कुलकर्णी

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
110.00