मुखपृष्ठ
गावसासू

माझे शेल्फ

गावसासू

इंग्रजी शीर्षक
Gavsasu
सारांश

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले. "मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - गावसासू एनआरआय यांचा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे :१९३० सालीच त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी "गावसासू - परागंदा भारतीयांचे एक सामाजिक दृश्य " या कादंबरीत केले आहे. केतकरांना विदेशवस्तव्याचा अनुभव होता आणि त्यांच्यापाशी एक व्यासंगनिष्ठ समाजशास्त्रीय दृष्टी होती:मग त्यांची कादंबरी गतकाळातच आजच्या आपल्या सामाजिक वास्तवाचा वेध घेऊ शकली यात आश्चर्य कसले ?मात्र गावसासू मिसेस दास आणि तिच्या मुली यांच्याभोवतीच्या स्वैर जीवनाचे चित्रण कितपत वास्तव आहे, या शंकेने वाचक अस्वस्थ होतो खरा ! - डॉ. द. भि. कुलकर्णी

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
160.00