मुखपृष्ठ
गोंडवनातील प्रियवंदा

माझे शेल्फ

गोंडवनातील प्रियवंदा

इंग्रजी शीर्षक
Gondvanatil Priyavandha
सारांश

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले. "मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - गोंडवनातील प्रियवंदा ही त्यांची १९२६ ची कादंबरी. समाजशास्त्रीय "घरकुट्टे घराण्याचा इतिहास" असा जोडमथळा असलेल्या या कादंबरीतील बिंबा म्हणते , "राष्ट्र म्हणजे बायका, पुरुष नव्हे." ही कादंबरीकाराचीच भूमिका ;ती आजच्या समाजाने काळजात आणि कपाटात जपली पाहिजे. - डॉ. द. भि. कुलकर्णी

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
210.00