तीव्र मध्यम
इंग्रजी शीर्षक
Tivra Madhyam
सारांश
अधांतरी मन:स्थिती, सततची अस्वस्थता, विचारांची उलघाल आणि काहीतरी न सापडण्याची सततची जाणीव... स्वरसान्निध्याच्या सवयीमुळे असेल कदाचित, या काव्यसंग्रहास शीर्षक द्यायचे मनात आल्यावर ‘पंचम’ ह्या निर्मितीच्या स्वराजवळ असलेला, ‘तीव्र मध्यम’ हा काव्यलिखाणातील भाव-अभिव्यक्तीचा स्वर आहे असे जणू मनात झंकारले! आणि हेच नाव द्यायचे ठरले! माझ्या काव्यसंग्रहाचा जणू हाच वादी स्वर! राग संगीतात या स्वरावर न्यास नाही त्यामुळे तो कुठल्याच रागाचा वादी-स्वर नाही! पण संगीतापेक्षा मोठे जगणे! अन् श्वास आहे, तोवर न्यास कशाला? इतर सारेच स्वर-अनुवादी... जगण्याच्या मांडणीत वर्ज्य स्वर कुठलाही कसा असेल? शोध इथला संपत नाही... हेच खरे! विदुर महाजन