Dakkhanachi Bhadrakali Maharani Tarabai
पराभवाच्या राखेतूनच एक ठिणगी जन्माला आली. त्या छोट्या; पण दाहक ठिणगीची धग गढदुर्गापासून जंगलांपर्यंत आणि डोंगरदऱ्यांपासून नदीच्या खोऱ्यांपर्यंत सर्वत्र पसरली. काळानं उभ्या केलेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सृज्ज झाली एक स्त्री, ताऱ्यासमान तेजस्वी 'तारा'! तिनं संघर्षाला नवी ऊर्जा दिली, नविनतम अपारंपरिक रणनीती आखल्या आणि आत्यंतिक धैर्यानं लढाही दिला.
औरंगजेबानं मराठ्यांच्या विरोधात आपल्या संपूर्ण साम्राज्याची ताकद पणाला लावली. दहा लाखांहून अधिक सैनिक आणि अपार संपत्तीसह दोन दशकं सातत्यानं युद्ध करूनही त्याला मराठ्यांचा बीमोड करता आला नाही. कारण दख्खनची माती आपल्या सुपुत्रांना कधीच विसरत नाही आणि आपल्या गर्भावर होणाऱ्या अत्याचारांना कधीही माफ करत नाही, हे मुघल साम्राज्याला कधी कळलंच नाही.
सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांमधून पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं गेलं... एक विधवा महाराणी, घायाळ झालेले योद्धे आणि खचलेली मनं यांनी शस्त्ररूप धारण केलं, अमीची प्रखरता अंगी बाणली. हो कथा आहे मराठ्यांच्या अजिंक्य महाराणीची... ताराराणीची... दख्खनच्या महाकालीची!