मुखपृष्ठ
Sadguru Darshan

माझे शेल्फ

Sadguru Darshan

इंग्रजी शीर्षक
Sadguru Darshan
सारांश

गुरु-शिष्य परंपरा हा भारतीय ज्ञानपरंपरेचा अमूल्य वारसा आहे. तीर्थरूप असणाऱ्या मातापित्यांनाही मुक्ती देणारे व स्वतःबरोबरच इतरांची जीवननौकाही भवसागरापल्याड घेऊन जाणारे सदगुरु हे सर्वश्रेष्ठ तीर्थ असतात. परमेश्वराच्या सोहम्-ध्यानयुक्त भक्तीचे ज्ञान व अनुभव देणारी ॐकारस्वरूप व्यक्ती 'सदगुरु' असते. 'सद्गुरुदर्शन' हा ग्रंथ अनेकार्थांनी विशेष आहे. सकल सिद्धांना गुरुस्थानी असलेले श्रीसदाशिव यांनी 'गुरुगीते'त 'ब्रह्मानंदं परमसुखदं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्' असे सद्गुरुंचे जे चौदा विशेष उल्लेखिले आहेत, त्यांचे साधार व सविस्तर स्पष्टीकरण डॉ. विजय बाणकर यांनी या छोटेखानी ग्रंथात केले आहे.



याशिवाय सद्गुरुंचे स्वरूप व कार्य, सद्गुरुस्वरूपाचे अगाधपण, सद्गुरुनामाचा अर्थ, सद्गुरु या संज्ञेची केलेली व्याख्या असे अनेक तपशील या ग्रंथात समाविष्ट आहेत. यामुळे सद्गुरु हे देवाहून थोर आहेत, असे संत का म्हणतात याचे सुस्पष्ट आकलन होते. सदैव संग्रही असावा, असा ग्रंथ

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
150
भाषा
मराठी
किंमत
200.00