Ouch to OOPS (Marathi)
राम-जी वल्लतकडे सर्वकाही होते. त्याचे शिक्षण आयआयटीमधून झाले होते, त्याला २००% घरवाढ मिळाली होती, आणि एका सुप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कॉम्प्युटर हार्डवेअर फर्ममध्ये संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याला वाटले की ‘आयुष्य सेट झाले’.
पण काही काळातच हे ‘सेट’ आयुष्य त्याचा चुराडा करत त्याच्या अंगावर कोसळले. त्याला स्नायू दुर्बल करणारा दुर्मीळ ऑटोइम्युन आजार झाल्याचे कळले. शर्टची बटणे लावणे, पायऱ्या चढणे-उतरणे, कीबोर्डवर टायपिंग करणे अशा साध्या कामांनाही राम-जीला अतिशय अतिकष्टदायक वाटू लागले. आणि या समस्यांमुळे त्याची नोकरीही गेली.
सगळीकडून अंधार दिसत होता आणि आशेचा किरणही नाहीसा झाल्यासारखा वाटत होता. तरीही, राम-जीने जिद्द सोडली नाही आणि हार मानली नाही.
फ्रॉम आऊच टू ऊप्स ही राम-जीची प्रेरणादायी जीवनकहाणी आहे. ही कहाणी फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दुर्बलतेवरही मात करायला प्रेरणा देते. ही आपल्याला उमेद आणि धैर्य शिकवते, वेदनेतही हसण्याची कला दाखवते, कॉर्पोरेट जगतातील आव्हाने कशी पेलावी ते शिकवते, आणि जेव्हा आयुष्य कठीण होते, तेव्हा कठीण माणसे कशी हसतमुख राहतात हेही दाखवते.
“विमानतळावर हे पुस्तक वाचण्यात इतका गुंग झालो की आयुष्यात प्रथमच माझे विमान चुकले.”
– डॉ. ए. वेलुमनी, चेअरमन, थायरोकेअर
“आपल्या जीवनात सकारात्मकतेचा थोडासा शिडकावा हवा असणाऱ्या प्रत्येकाने हे लोभस पुस्तक वाचायलाच हवे. ‘काहीही करणे शक्य आहे’ हा विश्वास पुन्हा जागवणारे पुस्तक!”
– लीना नायर, प्रमुख मनुष्यबळ विकास अधिकारी, युनिलिव्हर
“गंभीर, विचारप्रवृत्त करणारा आशय आणि हलकीफुलकी, स्वतःवर हसणारी नर्म विनोदी शैली याचा सुरेख मेळ म्हणजे फ्रॉम आऊच टू ऊप्स – खूपच प्रेरणादायक पुस्तक!”
– आशीश दीक्षित, सीईओ, मधुरा फॅशन अँड लाईफस्टाईल
Ram-ji Vallat had everything going for him. He graduated from IIT, received a 200% hike, and after taking on the role of director at a renowned multinational computer hardware firm, he felt that his “life was set.”
But soon, this seemingly “set” life began to crumble. He was diagnosed with a rare autoimmune disease that weakened his muscles. Simple tasks like buttoning a shirt, climbing stairs, or typing on a keyboard became extremely difficult. And as if that wasn’t enough, he lost his job.
Darkness seemed to surround him, and hope appeared nowhere in sight. Yet, Ram-ji did not give up. He refused to surrender to circumstances.
From Ouch to Oops is the inspiring life story of Ram-ji. The book motivates readers not only to overcome physical challenges but also to triumph over mental and emotional struggles. It teaches hope and courage, shows how to smile even in pain, demonstrates how to navigate challenges in the corporate world, and reveals how resilient individuals remain cheerful even when life is toughest.
“I was so engrossed reading this book at the airport that, for the first time in my life, I missed my flight.”– Dr. A. Velumani, Chairman, Thyrocare
“Everyone who wants a little positivity in their life must read this compelling book. It rekindles the belief that ‘Anything is Possible!’”– Leena Nair, Chief Human Resources Officer, Unilever
“A perfect blend of serious, thought-provoking content and light-hearted, self-deprecating humor makes From Ouch to Oops an extremely inspiring read!”– Ashish Dixit, CEO, Madhura Fashion & Lifestyle