मुखपृष्ठ
Gitayog Shodh Brahmavidyecha - Adhyay 4 - Dr. Shri Balaji Tambe

माझे शेल्फ

Gitayog Shodh Brahmavidyecha - Adhyay 4 - Dr. Shri Balaji Tambe

इंग्रजी शीर्षक
Gitayog Shodh Brahmavidyecha - Adhyay 4 - Dr. Shri Balaji Tambe
सारांश

डॉ. श्री बालाजी तांबे

श्री गीतायोग | शोध ब्रह्मविद्येचा

पाच - साडेपाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाचे निमित्त करून सदासर्वकाळ उपयोगी पडणारे सत्य सांगितले. संत साक्षात्कारी मंडळींनी, अभ्यासकांनी अनेक अनेकांनी श्रीमद्भगवद्गीतेवर चिंतन करूनही ते पूर्ण झाले नाही. काळानुसार तिच्यातील शब्दांचा, कल्पनांचा संदर्भ बदलतो आणि चिंतनातून नवीनच नवनीत हाती गवसते.

भारतीय संस्कृतीचा सखोल विचार करणारे गुरू डॉ. श्री बालाजी तांबे २१व्या शतकाचा संदर्भ ठेवून गीतेचा अर्थ उलगडायला लागतात, तेव्हा सध्याच्या स्पर्धात्मक, गतीमान आणि दगदगीच्या जीवनशैलीतही आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत आणि मनःस्थितीत सुखशांती देणारी व अंतिम कल्याणाची विद्या देणारी 'ब्रह्मविद्या'च

गुरू डॉ. श्री बालाजी तांबे गीतेच्या चिंतनातून आपल्याला समजावीत असतात. यात कुठेही अभिनिवेश नाही; उलट, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच दिलेल्या प्रेरणेमुळे आपल्याला गीता समजणे व आचरणात आणणे सोपे होऊ शकते, अशी त्यांची धारणा आहे.

गुरू डॉ. श्री बालाजी तांबे आपले गीतेसंबंधीचे चिंतन सध्याच्या जीवनपद्धतीला उपयोगी पडेल अशा रीतीने 'साम मराठी' वाहिनीवर 'श्री गीतायोग : शोध ब्रह्मविद्येचा' या कार्यक्रमातून मांडत आहेत. गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे स्वतंत्र निरूपण करणारे पुस्तक चर्चा चिंतनास, अभ्यासास प्रवृत्त करणारे ठरेल. दैनंदिन व्यवहारात

कर्म मार्गदर्शन करणारे ठरेल.



Dr. Shri Balaji TambeShri Geetayog | Shodh BrahmavidyechaFive to five-and-a-half thousand years ago, Shri Krishna, using Arjuna as an instrument, revealed truths that remain universally relevant. Even though saints, enlightened masters, and scholars have reflected on the Shrimad Bhagavad Gita countless times, its essence was never fully exhausted. Over time, the meaning of its words and concepts changes, and new insights continuously emerge from reflection.



Guru Dr. Shri Balaji Tambe, who deeply studies Indian culture, interprets the meaning of the Gita in the context of the 21st century. Through this, even in today’s competitive, fast-paced, and chaotic lifestyle, we can find answers to our questions. In stressful situations and unsettled mental states, the Gita provides peace, contentment, and knowledge for ultimate welfare—this is the “Brahmavidya.”



Through reflection on the Gita, Guru Dr. Shri Balaji Tambe explains it in a way that makes it understandable. There is no artificial embellishment; rather, he believes that the inspiration given directly by Shri Krishna makes understanding and applying the Gita in life much easier.



Guru Dr. Shri Balaji Tambe presents his reflections on the Gita in a way that is useful for modern life through the ‘Shri Geetayog: Shodh Brahmavidyecha’ program on the Saam Marathi channel. The book, which provides a detailed explanation of each chapter of the Gita, encourages discussion, reflection, and study. It also serves as a practical guide for daily action and ethical conduct.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
250.00