Trayodashi
त्रयोदशीमध्ये डॉ. सदानंद मोरे यांनी संतसाहित्याची समीक्षा केलेली आहे. 'ज्ञानदेवांची भक्ती' ह साहित्यविमर्शाचा केंद्रबिंदू आहे. तत्त्वज्ञान, साहित्यशाख, समाजदर्शन या तीन विचारमितींना जोडणारे विवेचन डॉ. मोरे यांनी केले आहे. वारकरी संप्रदायाने मांडलेला भक्तिमार्ग ईश्वर, मानव आणि एकूण विश्व यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करतो. विश्व जसे आहे तसे परमात्माच आहे असे पाहणे म्हणजे भक्ती, हा या विवेचनाचा सारांश आहे. त्रयोदशीतील 'संतसाहित्याचे समाजशास्त्रीय अध्ययन' हे प्रकरण म्हणजे या विवेचनाचे विचार-शिखर होय उत्पादनव्यवस्था, संतांनी संवादासाठी स्वीकारलेली विचारचौकट, आणि लोकसंग्रहामधून होणारे सामाजिक अभिसरण या तीन पैलूच्या आधारे संतांचे कार्य डॉ. मोरे यानी विशद केले आहे.
डॉ. सदानंद मोरे यांच्या तुकाराम दर्शन, लोकमान्य ते महात्मा या वैचारिक ग्रंथरचनाची इमारत त्रयोदशीमधील विचारविमर्शावर उभारलेली आहे. म्हणून हा ग्रंथ वाचक, अभ्यास, संशोधकांसाठी महत्त्वाचा आहे.
In Trayodashi, Dr. Sadanand More presents a critical analysis of saint literature. “Dnyanadev’s Bhakti” is the central focus of this literary discourse. Dr. More connects three dimensions of thought—philosophy, literary studies, and social perspective—in his analysis. The path of devotion (Bhakti) as presented by the Varkari tradition explains the interrelationship between God, human beings, and the universe. To perceive the universe as it is, as a manifestation of the Supreme Being, is the essence of devotion—this is the core idea of the discussion.
The chapter titled “A Sociological Study of Saint Literature” represents the intellectual peak of this work. Based on three aspects—the system of production, the conceptual framework adopted by saints for communication, and the process of social integration through mass engagement—Dr. More elaborates on the contributions of the saints.
Dr. Sadanand More’s other major intellectual works, such as Tukaram Darshan and Lokmanya to Mahatma, are built upon the foundation of the ideas discussed in Trayodashi. Therefore, this book holds great importance for readers, scholars, and researchers.