Sharirvidnyanache Tushar : Dr. H V Sardesai
आपण कधीच आजारी पडू नये अशीच आपली इच्छा असते. एवढंच नाही तर आपण सुदृढ, तल्लख, चपळ , आनंदी असावे, बऱ्याच गोष्टी सहज करता याव्यात असंही मनापासून वाटत असतं. ठणठणीत प्रकृती असणारेही कधी ना कधी आजारी पडतात किंवा अस्वास्थ्याची काही लक्षणं त्यांच्यात दिसू लागतात. प्रति धन्वंतरी म्हणून विख्यात असलेले डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी प्रकृतिविषयक लहानसहान विषयांवर पटरन वाचून होईल अशा प्रकारतं केलेलं लेखन
' साप्ताहिक सकाळ'मध्ये सदर रूपानं प्रसिद्ध झालं. तेच छोटे छोटे लेख ' शरीर-विज्ञानाचे तुषार' मधून संग्रहित केलेलं आहे.
आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं? ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, गरगरणे, पोटात दुखणे यांसारखे नेहमीचे आजार का आणि कशामुळे होतात ? साधा खोकला कोणता आणि धोकादायक कोणता ? कावीळ झाल्यावर व्यक्ती पिवळी का दिसते ? कोणते आजार टाळता येतात ? कोणत्या तपासण्या कधी कराव्यात ? हे आहेत आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकातून मिळू शकतात. अत्यंत क्लिष्ट असलेल्या शरीर- विज्ञानाबाबत आपल्या निरामय प्रकृतीसाठी जाणून घेणं हिताचं. अगदी थोड्या वेळात वाचून होईल असं हे सहजसोपं लेखन एकदा वाचल्यावर वारंवार वाचावंसं वाटेल.
We always wish that we never fall ill. Not only that, we also deeply desire to remain healthy, alert, agile, and happy, and to be able to carry out many tasks with ease. However, even those who appear perfectly healthy do fall ill at some point or begin to show signs of discomfort.
Renowned as a modern-day Dhanvantari, H. V. Sardesai has written simple, easy-to-read articles on various aspects of health. These articles were originally published as a column in Saptahik Sakal and have now been compiled into the book Sharir-Vidnyanache Tushar.
What does it really mean when we fall ill? Why do common ailments like fever, cold, cough, headache, dizziness, and stomach pain occur? Which cough is harmless and which one is dangerous? Why does a person turn yellow when affected by jaundice? Which diseases can be prevented? When should medical tests be done? These are questions we often have.
This book provides answers to many such queries. Understanding the complex science of the human body is essential for maintaining good health. Written in a simple and accessible style that can be read in a short time, this book is so engaging that once you read it, you will feel like revisiting it again and again.