Vatchal Bhag 2
आयुष्याच्या वाटचालीत भेटलेली प्रत्येक व्यक्ती अनुभव काही ना काही चिरंतन ठेवा आपल्याला देत असते. त्यातून होणाऱ्या आत्मचिंतनातून स्वतःचा काही एक विचार, सामाजिक अन् व्यक्तिगत दृष्टिकोन तयार होतो. प्रतापराव पवार यांचे लेखन याचीच ग्वाही देते. आपल्या जीवनप्रवासातले वैविध्यपूर्ण अनुभव आणि भेटलेल्या व्यक्तींमुळे घडत गेलेले स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि निरीक्षणे ते या लेखनातून मांडतात. मात्र तरीही हे लेखन केवळ वैयक्तिक अनुभवांपुरतेच मर्यादित नाही.
अनेक देशांतील संस्कृती, तिथले स्तुत्य बदल, भारतातील सद्यःस्थिती, आर्थिक – शैक्षणिक क्षेत्रांतले प्रश्न, पर्यावरणाच्या समस्या, जागतिकीकरण, प्रसारमाध्यमांचे झपाट्याने बदलणारे जग अशा विविध विषयांवरचे त्यांचे विचार वाचताना, त्यांनी मांडलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या परिघात वाचक स्वतःचे स्थान शोधू लागतो.
लोकशाहीचा अनेक वर्षांचा इतिहास असणाऱ्या जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या लोकशाहीचे वय खूप लहान आहे, हे भान ठेवत प्रत्येकाने या सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत आपले योगदान दिले तर, भारत निश्चितपणे महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांचे लेखन देते.
सामाजिक परिवर्तनाची ओढ असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे मुक्त चिंतन.
Every person we meet on the journey of life imparts some timeless experience to us. Through the self-reflection that arises from these encounters, we develop our own thoughts and perspectives—both social and personal. The writings of Prataprao Pawar bear testimony to this. He presents, through his essays, the diversity of experiences from his life journey, the influence of the people he has met, and the shaping of his own personality and observations. Yet, his writing is not limited to personal experiences alone.
While reading his thoughts on cultures of various countries, notable changes abroad, the current situation in India, economic and educational issues, environmental challenges, globalization, and the rapidly changing world of media, the reader begins to find their own place within the broader scope of social transformation he discusses.
Keeping in mind that compared to other countries with a long history of democracy, our own democracy is still very young, he emphasizes that if each individual contributes to this process of social change, India can undoubtedly become a great power.
This collection of essays represents free and reflective thinking that should be read by anyone who feels drawn to the cause of social transformation.