मुखपृष्ठ
Kukkutpalan vyvsay Margdarshak : Vasant Hingne

माझे शेल्फ

Kukkutpalan vyvsay Margdarshak : Vasant Hingne

इंग्रजी शीर्षक
Kukkutpalan vyvsay Margdarshak : Vasant Hingne
सारांश

कुक्कुटपालन व्यवसायाविषयी मिळवा परिपूर्ण मार्गदर्शन



पावसाची अनियमितता तसेच इतरही अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांवर विसंबून राहावे लागते. दुग्धोत्पादन, शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांबरोबरच कुक्कुटपालन हा व्यवसायही शेतकऱ्यांसाठी तसेच इतर व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र, आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन केल्यास त्यातून कमी श्रमात आणि खर्चात अधिक लाभ मिळवता येतो. त्यासाठी शास्त्रशुद्ध कुक्कुटपालन व्यवसायाचे तंत्र माहिती करून घेण्याची गरज आहे. हे जाणून कुक्कुटपालन तंत्राचे अभ्यासक डॉ. वसंत हिंगणे लिखित 'कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शक' हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.



गेली अनेक वर्षे कुक्कुटपालन क्षेत्रात नवनवीन व्यावसायिक संस्था व व्यावसायिकही उतरल्यामुळे या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. अशावेळी व्यवसायात नव्याने उतरू पाहणाऱ्या व्यावसायिकांनी नेमका कोणत्या गोष्टींचा विचार करावा, तसेच आधीपासून या व्यवसायात असलेल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आपला व्यवसाय कसा वाढवावा व अधिक नफा मिळवण्यासाठी नेमके काय करावे, याबाबत या पुस्तकात तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले आहे.



ब्रीडर पक्ष्यांबद्दलची दुर्मीळ माहिती, अंड्यांची उबवणूक, आरोग्य व्यवस्थापन, विविध रोग व त्यांचा प्रतिबंध, पक्ष्यांसाठी खाद्य अशा अत्यावश्यक विषयांचा संपूर्ण तपशील या पुस्तकात आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालनातील धोके, नवनवीन रोग, पक्ष्यांकडून माणसांना होणारे रोग, बाजारपेठेतील स्पर्धा, जागतिकीकरणाचा परिणाम याबद्दल माहिती देत असतानाच डॉ. हिंगणे यांनी प्रकल्प अहवाल व अनुवंशशास्त्र या किचकट विषयांबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.



पुस्तकातील प्रमुख विषय :



कुक्कुटपालन व्यवसायाविषयी प्राथमिक माहिती

आनुवंशिकताशास्त्र आणि कुक्कुटपालन

देशी कोंबड्यांचे व्यावसायिक पालन

आधुनिक कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रकार

कुक्कुटपालन व्यवसायाविषयी काही आवश्यक प्रारंभिक माहिती

कुक्कुटपालनासंबंधी वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी-मराठी तांत्रिक शब्दांचा परिचय

प्रकल्प अहवाल

करारबद्ध कमर्शिअल ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय

कोंबड्यांच्या शरीररचना व शरीरक्रियाशास्त्राबद्दलची संक्षिप्त माहिती

आहारशास्त्र, कुक्कुटखाद्य व आहार व्यवस्थापन

कमर्शिअल ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय

कमर्शिअल लेअर कुक्कुटपालन व्यवसाय

ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय

ब्रॉयलर ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय

लेअर ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय

अंडी उबवणी केंद्राचे व्यवस्थापन

नोंदी व नोंदींचे व्यवस्थापन

आरोग्य व्यवस्थापन

कोंबड्यांचे रोग व त्यांचे नियंत्रण

कुक्कुटपालन व्यवसायातील काही व्यवस्थापकीय क्रिया



Get Complete Guidance on Poultry Farming Business



Due to irregular rainfall and several other factors, farmers have to depend on allied agricultural activities. Along with supplementary businesses like dairy farming and goat rearing, poultry farming has also become a profitable venture for farmers as well as other entrepreneurs. However, if poultry farming is carried out using modern methods, higher profits can be achieved with less labor and cost. For this, it is necessary to understand scientific poultry farming techniques. Recognizing this need, a book titled “Poultry Farming Business Guide” written by poultry expert Dr. Vasant Hingne has recently been published by Sakal Publications.



Over the past several years, many new organizations and entrepreneurs have entered the poultry sector, increasing competition. In such a situation, this book provides detailed guidance on what new entrants should consider before starting the business, as well as how existing poultry farmers can expand their operations and increase profitability.



The book includes rare and valuable information on breeder birds, egg incubation, health management, various diseases and their prevention, and poultry feed. It also discusses risks in poultry farming, emerging diseases, zoonotic diseases (those transmitted from birds to humans), market competition, and the impact of globalization. Additionally, Dr. Hingne explains complex topics like project reports and genetics in simple language.



Contents of the Book



Basic information about poultry farming

Genetics and poultry farming

Commercial rearing of indigenous (desi) chickens

Types of modern poultry farming

Essential preliminary information about poultry farming

Introduction to English–Marathi technical terms used in poultry farming

Project report

Contract commercial broiler poultry farming

Brief information on anatomy and physiology of chickens

Nutrition, poultry feed, and feed management

Commercial broiler poultry farming

Commercial layer poultry farming

Breeder poultry farming

Broiler breeder poultry farming

Layer breeder poultry farming

Hatchery management

Record keeping and management

Health management

Diseases of poultry and their control

Some managerial practices in poultry farming

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
264
भाषा
मराठी
किंमत
649.00