मुखपृष्ठ
Best of Family Doctor

माझे शेल्फ

Best of Family Doctor

इंग्रजी शीर्षक
Best of Family Doctor
सारांश

बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्टर



भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा घटक आहे फॅमिली डॉक्टर. जसे आयुर्वेद हा वेदांचा उपवेद आहे, तसे फॅमिली डॉक्टर म्हणजे कुटुंबाचे उपकुटुंब होय. फॅमिली डॉक्टर हा जणू कुटुंबाचाच एक सदस्य असतो. "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्" असे म्हटले जाते.



शरीराची संपूर्ण माहिती, शरीराला वाढवणे, पुष्ट करणे, निरोगी ठेवणे, रोग होऊ नये म्हणून प्रतिकार करणे, रोग झाला तर तो बरा करणे, अपघात झाल्यास शरीराला पूर्वावस्थेत आणणे वगैरे गोष्टी प्रत्येकाला ज्ञात असतीलच असे नाही. हे सर्व सांभाळणारी एक विशिष्ट व्यक्ती म्हणजे वैद्य वा डॉक्टर असते.



उपचारांची योजना करताना सर्व अंगांचा विचार करून व्यक्तीवर कुठल्या वेळेला कोणत्या प्रकारचे उपचार देण्याची गरज आहे हा निर्णय घेणे फार गरजेचे असते. तसा निर्णय घेण्यासाठी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना, फॅमिली डॉक्टर ही व्यक्ती आणि फॅमिली डॉक्टर हा ग्रंथ उपयोगी पडू शकतो.



"बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्टर" या संग्रहात प्रातिनिधिक रोग घेऊन त्यांची माहिती व त्यावरील उपचार समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक घरात कायम फॅमिली डॉक्टरसारखा सल्ला देणारे ठरू शकेल.



The concept of a family doctor is an important part of Indian culture. Just as Ayurveda is considered a subsidiary of the Vedas, a family doctor can be seen as an extension of the family itself. A family doctor is almost like a member of the household.



It is often said, “Shariram Adyam Khalu Dharmasadhanam” (the body is the primary means for fulfilling one’s duties). Not everyone possesses complete knowledge about the human body—how to nurture it, strengthen it, keep it healthy, prevent diseases, cure illnesses, or restore it after an injury. A physician or doctor is the person who takes care of all these aspects.



While planning treatment, it is essential to consider all aspects of an individual’s health and decide what kind of treatment is needed at a particular time. The concept of a family doctor, the role of such a person, and this book itself can be helpful in making such decisions.



The collection “Best of Family Doctor” includes information about representative diseases and their treatments. Therefore, this book can serve as a constant guide at home—just like having a family doctor available for advice.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
650.00