Parighabaher : Laxman Gaikwad
लक्ष्मण गायकवाड लिखित 'परिघाबाहेर' या पुस्तकात भटक्या, गावकुसाबाहेर जगणं जगावं लागणाऱ्यांच्या जिवंत कहाण्या आहेत. नंदीबैलाचा खेळ करून दाखवणारा समाज, नाच-गाणी करणाऱ्या वाया, वैदू, फारेपारधी, गोंधळी, वडार, पाथरूट, कैकाडी, धनगर, उचल्या अशा आपल्याच समाजघटकाचं अंतरंग एकेका कहाणीतून उलगडून दाखवलं आहे.
सहसा न दिसणारं माणसांचं अस्सल जगणं या कहाण्यांमध्ये आपल्याला सापडतं, हे या पुस्तकाचं विशेष आहेच. पण त्याही पुढे जाऊन या कहाण्यांमध्ये केवळ संघर्ष नाही, निव्वळ वेदनाही नाहीत. सुख, आनंद, स्थिती-परिस्थिती बदलण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि यशाचा स्पर्श... हा सहसा अशा कहाण्यांमध्ये वाचायला न मिळणारा ऐवज या कहाण्यांतून पाझरल्यानं त्या वाचताना वाचक म्हणून आपल्या समजुतीचा परीघ रूंदावतो.
हे पुस्तक आकलनाची त्रिज्या कैक पटीनं वाढवतं. परिघाबाहेरचा समाज परिघात आणण्यासाठी यापेक्षा दुसरं काय हवं?
Laxman Gaikwad’s book Parighabaher presents vivid, real-life stories of nomadic communities and those forced to live on the margins of society. Through these narratives, the inner world of various communities—such as those who perform with Nandi bulls, traditional dancers and singers, and groups like the Vaidu, Phare Pardhi, Gondhali, Wadar, Pathrut, Kaikadi, Dhangar, Uchlya, and others—is brought to light. These stories reveal a raw and authentic way of life that is rarely seen or understood.
What makes this book truly special is that it goes beyond depicting mere struggle and suffering. It also captures moments of happiness, resilience, efforts to change circumstances, and glimpses of success—elements not often found in such narratives. As a result, while reading these stories, the reader’s perspective expands and becomes more inclusive.
This book significantly broadens the radius of understanding—what more could one ask for to bring those living outside the social boundary into its fold?