Gramshidori
'ग्रामशिदोरी' या ग्रंथातील ललितलेखांना सामान्य वाचकांच्या रोजच्या जीवनाचा सुगंध लाभला आहे. आपल्या अवतीभवतीच्या माणसांची त्यांच्या भावभावना आणि विचारांसह भेट या लेखांतून होते.
संस्कारांची शिदोरी, परिवर्तनाचा ध्यास, शिक्षणाचे महत्त्व, माणसांचे ममत्व, स्वभावांचे दर्शन, गाव व शहरातील नातेसंबंध आणि जगण्यातील दिलखुलासपणा अशा सर्व पैलूंचा समावेश या ललितलेख संग्रहात केला आहे.
'दैनिक अग्रोवन' मधील लोकप्रिय सदर 'मशागत' मधील निवडक लेखांचे हे पुस्तकरूप रोजच्या जगण्यातील संघर्षाचे आणि त्यातून घडणाऱ्या माणुसकीचे दर्शन घडवणारे आहे.
एका संवेदनशील भाषाभ्यासकाने ग्रामीण जीवनातील सकस जीवनानुभवांचा घेतलेला धांडोळा : 'ग्रामशिदोरी'
The essays in “Gramshidori” carry the fragrance of the everyday lives of common readers. Through these writings, we encounter people around us along with their emotions and thoughts.
This collection of literary essays covers various dimensions such as the richness of values, the drive for change, the importance of education, human affection, glimpses of human nature, relationships between village and city life, and the openness and warmth of living.
This book is a compilation of selected articles from the popular column “Mashagat” published in Dainik Agrovan, reflecting the struggles of daily life and the humanity that emerges from them.
A sensitive exploration by a keen student of language into the rich life experiences of rural living: “Gramshidori.”