मुखपृष्ठ
Striyansathi Kayade

माझे शेल्फ

Striyansathi Kayade

इंग्रजी शीर्षक
Striyansathi Kayade
सारांश

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान दर्जा व समान वागणूक देण्याची ग्वाही दिली आहे. असे असूनही आजही स्त्रियांना दुय्यम समजण्याची सामाजिक प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळेच स्त्रियांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी वेगवेगळे कायदे करण्याची गरज भासली. महिलांविषयी अशा महत्त्वाच्या कायद्यांची माहिती, कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीला असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक.



प्रत्येक कायद्यामागचा थोडक्यात इतिहास, कायदा करण्याची गरज, त्यातील महत्त्वाच्या संकल्पना, त्यातील विविध कलमे, पोटकलमे, महत्त्वाच्या तरतुदी यांची माहिती.



सर्वसामान्य वाचकाला पुस्तक वाचताना अवघड व क्लिष्ट वाटू नये, याचे भान ठेवून केलेली मांडणी. सहज महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यासारखी लेखनशैली.



कौटुंबिक पातळीवर, कामाच्या ठिकाणी, समाजात वावरताना स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी कायद्याची मदत कशी घेता येते याविषयी मार्गदर्शन.



कुटुंबाच्या मालमत्तेत वारसा हक्क कोणाला मिळतो? कौटुंबिक अत्याचार कशाला म्हणायचे? पोटगी मागण्याचा अधिकार कोणाला असतो? लैंगिक छळ कशाला म्हणायचे? त्यापासून संरक्षण कसे मिळवायचे? स्त्री देहाचे अश्लील प्रदर्शन म्हणजे काय? मातृत्व लाभाचे हक्क कोणते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी उपयुक्त कायदेशीर माहिती.



The Preamble of the Indian Constitution itself guarantees equal status and equal treatment to both women and men. Despite this, even today there exists a social tendency to treat women as secondary. Therefore, to safeguard women’s right to live with dignity, it became necessary to enact various laws. It is extremely important for every woman to be aware of such important laws before approaching the courts. This book serves as a useful guide for that purpose.



It provides brief information about the background of each law, the need for its enactment, key concepts, various sections and subsections, and important provisions.



The content is presented in a way that ensures it does not feel difficult or complex for the common reader. The writing style is simple and conversational, making important points easy to understand.



The book offers guidance on how women can use legal provisions to address injustice faced at the family level, workplace, and in society, and to protect their right to live with dignity.



It answers important questions such as: Who has inheritance rights in family property? What constitutes domestic violence? Who has the right to claim maintenance? What is sexual harassment, and how can one seek protection from it? What is considered obscene representation of the female body? What are maternity benefit rights? Thus, it provides useful legal information on a wide range of such issues.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2000
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
225.00