मुखपृष्ठ
Shahid Bhagat Singh

माझे शेल्फ

Shahid Bhagat Singh

इंग्रजी शीर्षक
Shahid Bhagat Singh
सारांश

भगतसिंग म्हटले की सर्वसामान्यपणे मनात येते ती हसत हसत फासावर जाणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारकाची प्रतिमा.

पण भगतसिंग म्हणजे केवळ तेवढेच नाही. भगतसिंग म्हणजे

सशस्त्र क्रांतीला वैचारिक अधिष्ठान देणारा राजकीय विचारवंत

जाणीवपूर्वक हौतात्म्य स्वीकारून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारा वीर

'सांप्रदायिक दंगे और उनका इलाज', 'अछूत समस्या', 'मैं नास्तिक क्यों हूँ?' आदी विषयांवर मूलभूत विचार मांडणारा सुधारक

आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता असलेल्या अखंड भारताच्या निर्मितीच्या दिशा दाखवणारा मार्गदर्शक

जगाची रचना नव्याने करू पाहणाऱ्या विचारी आणि उत्साही तरुणांचे प्रेरणास्थान



भगतसिंग आजही तितकेच सयुक्तिक आहेत. कारण आजही

राष्ट्र गुलाम नसले, तरी कर्ज, त्यासाठीच्या अटी आणि व्यापार यांच्याद्वारे राष्ट्राचे शोषण होताना दिसते आहे.

नैसर्गिक स्रोतांवरील स्थानिकांचा अधिकार डावलून, सरकारी मर्जीतील भांडवलदारांना ते मातीमोल किमतीत विकले जातात.

विशिष्ट वर्गाचे हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी धर्माच्या नावे विद्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते.

गरिबांच्या उत्थानाचे साधन असलेल्या शिक्षणाचे व्यापारीकरण करून त्यांना त्यापासून वंचित केले जाते.

त्यामुळे आजही नवीन क्रांतीसाठी प्रेरणा देणारे भगतसिंगांचे विचार जिवंत आहेत.



भगतसिंगांच्या क्रांतिकार्यासोबतच त्यांच्या विचारविश्वाचा आढावा घेणारे प्रेरक चरित्र.



When one thinks of Bhagat Singh, the common image that comes to mind is that of a radiant revolutionary who went to the gallows with a smile.

But Bhagat Singh was much more than that. He was—



A political thinker who provided an ideological foundation to armed revolution.

A brave soul who consciously embraced martyrdom to bring India’s freedom struggle to international attention.

A reformer who presented fundamental ideas on issues such as ‘Communal Riots and Their Solution,’ ‘The Problem of Untouchability,’ and ‘Why I Am an Atheist.’

A guide who showed the path toward building an अखंड (united) India based on economic, social, and political equality.

A source of inspiration for thoughtful and energetic youth striving to reshape the world.



Bhagat Singh remains just as relevant today. Because even now—

Though the nation is not politically enslaved, it continues to face exploitation through debt, its conditions, and trade systems.

Natural resources are taken away from local communities and sold at throwaway prices to favored capitalists.

An atmosphere of hatred is created in the name of religion to protect the interests of certain groups.

Education, which should uplift the poor, is being commercialized, depriving them of access to it.



Therefore, Bhagat Singh’s ideas continue to live on, inspiring new revolutions even today.



This is an inspiring biography that not only highlights Bhagat Singh’s revolutionary work but also explores his world of ideas.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
किंमत
249.00