Dragon Ubha Dari
सुमारे ६० वर्षांनंतर चीनने गलवानच्या खोर्यात घुसखोरी करून भारताची कुरापत काढली तेव्हा चीनवर संपूर्ण विश्वास ठेवणे परवडणारे नाही याची जाणीव पुन्हा एकदा स्पष्टपणे झाली. आता हा ड्रॅगनरुपी चीन भारताच्या दारात उभा आहे. ड्रॅगनरुपी चीनने भारतासमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, धोक्याचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
भारत-चीन संबंध तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने महासत्तेच्या दिशेने सुरू असलेल्या आक्रमक, अत्यंत धोकादायक व विस्तारवादी वाटचालीची व गुंतागुंतीच्या जागतिक सत्तास्पर्धेची अपडेटेड व या विषयाची सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा सहज-सुलभ भाषेत अभ्यासपूर्ण माहिती 'ड्रॅगन उभा दारी' या पुस्तकातून देण्यात आली आहे.
भारत-चीनविषयक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडींमागील सूत्र उलगडून तपशील व तथ्यांवर आधारित विश्लेषण आणि भाष्य करणारे तसेच या घटना-घडामोडींसंदर्भातील विविध घटकांची सामान्य ज्ञानासह (GK) माहिती देणारे 'ड्रॅगन उभा दारी' हे पुस्तक असून राज्यशास्त्र, पत्रकारिता आदी सामाजिक शास्त्रांचे तसेच एम.फिल. व पीएच.डी., तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, मार्गदर्शक, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, राजकीय व सामाजिक विश्लेषक, अभ्यासक, संशोधक, आंतरराष्ट्रीय संबंध विषयाचे वाचक आदींसाठी 'ड्रॅगन उभा दारी' हे मौलिक संदर्भ पुस्तक आहे.
After nearly 60 years, when China intruded into the Galwan Valley and provoked India, it once again became evident that placing complete trust in China is not advisable. Today, this dragon-like China stands at India’s doorstep. This book examines the challenges and threats that such a China poses to India.
Dragon Ubha Dari presents a well-researched and updated study of India–China relations, especially in the backdrop of the COVID-19 pandemic, highlighting China’s highly strategic, aggressive, dangerous, and expansionist march toward becoming a global superpower, along with the complexities of global power competition—all explained in simple and accessible language for the general reader.
The book analyzes key events and developments in India–China relations by uncovering the underlying factors behind them, offering detailed, fact-based analysis and commentary. It also provides general knowledge (GK) related to these developments.
Dragon Ubha Dari serves as a valuable reference book for students of political science, journalism, and other social sciences, as well as for M.Phil. and Ph.D. scholars, aspirants preparing for the Union Public Service Commission (UPSC) examinations, mentors, college professors, political and social analysts, researchers, and readers interested in international relations.